एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…

तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? मग तुमच्यासाठी एलपीजी गॅस एजन्सीचा बिजनेस परफेक्ट ठरणार आहे. आज आपण याच बिझनेसची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

LPG Gas Agency Details : तुम्हालाही एखादा बिझनेस सुरु करायचा आहे का मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण एलपीजी गॅस एजन्सी कशी सुरू करायची, गॅस वितरकाला एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते, यासाठी किती खर्च येतो? अशा सर्व गोष्टींबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 

एलपीजी गॅस एजन्सी बिजनेस ठरणार फायद्याचा 

अलीकडे भारतात गॅसचे कनेक्शन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वी ग्रामीण भागात मुख्यतः स्टो किंवा चुलीवर स्वयंपाक बनवला जात असे. मात्र आता ग्रामीण भागातही गॅस सिलेंडरवरच स्वयंपाक बनवला जातोय. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही गॅस सिलेंडरचा वापर वाढलेला आहे.

भारतात जवळपास 34 कोटी गॅस सिलेंडरचे कनेक्शन अस्तित्वात आहेत. यावरून आपल्याला गॅस सिलेंडर एजन्सी बिजनेस किती फायद्याचा ठरू शकतो हे लक्षात येईल. त्यामुळे जर तुम्हाला बिजनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही गॅस एजन्सी सुरू करू शकता.

एका गॅस सिलेंडर मागे किती कमिशन मिळते 

14.2 kg वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या विक्रीवर गॅस सिलेंडर वितरकाला 73.08 रुपयांचे कमिशन मिळते. तसेच पाच किलो ग्रॅमच्या सिलेंडरवर 36.54 रुपयांचे कमिशन मिळते.

पण या कमिशनमध्येच वाहतुकीचा खर्च समाविष्ट असतो. पण गॅस वितरक फक्त गॅस सिलेंडरच्या विक्रीतूनच पैसे कमवतो असे नाही तर त्याला गॅस स्टोव्ह, पाईप्स, लाईटर आणि इतर उपकरणांची विक्री सुद्धा करता येते आणि यातून सुद्धा त्याला नफा मिळतो.  

गॅस एजन्सी साठी किती पैसा खर्च करावा लागेल?

जर तुम्हाला स्वतःची गॅस एजन्सी सुरू करायची असेल तर यासाठी 15 ते 30 लाख रुपयांचा खर्च करावा लागू शकतो. हा खर्च तुम्ही एजन्सी ग्रामीण भागात सुरू करणार आहात की शहरी भागात यावर अवलंबून राहील. जर तुम्हाला शहरी भागात एजन्सी सुरू करायची असेल तर साहजिकच खर्च अधिक होणार आहे.

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी सेक्युरिटी डिपॉझिट, डिलिव्हरी वाहन, गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी गोदाम आणि ऑफिस तसेच इतर सेटअप करण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागेल. पण गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही या व्यवसायासाठी बँकेकडून मदत घेऊ शकता. बँक या व्यवसायासाठी कर्ज मंजूर करू शकते.

लायसन्स कुठून मिळणार?

 जर तुम्हाला गॅस एजन्सी सुरू करायचे असेल म्हणजेच डीलर बनायचे असेल तर डीलरशिपचे लायसन घ्यावे लागेल. हे लायसन्स तुम्हाला भारतातील तीन प्रमुख सरकारी कंपन्या – इंडेन (IOCL), भारत गॅस (BPCL) आणि HP गॅस (HPCL) कडून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांकडून वेळोवेळी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती सुद्धा दिल्या जातात.

lpgvitarakchayan.in या पोर्टलवर सुद्धा तुम्हाला या जाहिरातीसंदर्भात माहिती मिळणार आहे. दरम्यान तुमच्या परिसरात एलपीजी गॅस एजन्सी साठी जाहिरात निघाली की तुम्हाला लगेच lpgvitarakchayan.in या पोर्टल वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अर्ज करताना तुम्हाला दहा हजार रुपयांचे अर्ज शुल्क सुद्धा भरावे लागेल जे की पूर्णपणे नॉन रिफंडेबल राहणार आहे.

कमाई किती होणार?

जर तुमच्या एजन्सी मधून महिन्याला 3000 सिलेंडर विकले गेलेत तर तुम्हाला दोन लाख 19 हजार 240 रुपयांचे कमिशन मिळणार आहे. यामध्ये तुमचा खर्च वजा करता तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!