नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.
माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

गडाख अलीकडेच आजारपणातून सावरले आहेत. त्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी सभा होती. त्यामध्ये त्यांचे आक्रमक रूप पहायला मिळाले.
सोनई येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा मेळावा यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांचे चिरंजीव माजी आमदार शंकराव गडाख यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा घेण्यात आला.

यावेळीही गडाख कोणत्यात पक्षात न जाता आपल्या शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फेच निवडणूक लढविणार आहेत.
त्यानंतर ज्या पक्षाची सत्ता येईल, त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणाही या मेळाव्यात करण्यात आली.
तालुक्यात पाण्याची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. अनेक पिके जळून गेली, जर पाऊस आला नसता, तर काय अवस्था झाली असती.
आपलं पाणी खाली चालले आहे आता तर सुमारे २ टीएमसी पाणी बीडला देण्याचा निर्णय झाला आहे. यावर तालुक्याचा आमदार काही बोलत नाही.
शंकरराव आमदार असताना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी व अकोले तालुक्यात धरणे बांधली जात असताना आपल्याच सरकारचे ज्येष्ठ मंत्री पिचड यांच्याशी वाईटपणा घेतला.
आगामी निवडणुकीत पाणीप्रश्नांवर लढणाऱ्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
- Shukra Gochar 2025: नवरात्रीनंतरचे दिवस ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार धनसंपत्ती देणारे! बघा भाग्यवान राशी
- Mhada Lottery 2025: पुण्यात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! लवकरच म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत.. बघा डिटेल्स
- Investment Tips: तुमच्या मुलाच्या 5 व्या वर्षापासून 5 लाखांची गुंतवणूक करा अन मिळवा 2.64 कोटी! चक्रवाढीची जादू करेल कमाल
- Sarkari Yojana: स्वतःचे किराणा दुकान सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 30 हजार…पहा योजनेची A टू Z माहिती
- अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारासह ‘या’ 17 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर पावसाची शक्यता !