“कामाच्या गुणवत्तेवरच ठेकेदारांची ओळख; राजकारण आणि ठेकेदारी वेगळीच राहणार” डॉ. सुजय विखे पाटील

Published on -

राहाता :  शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला असला तरी यापुढील काळात गुणवत्ता, आधुनिकता आणि शिस्तीवर भर दिला जाणार असून, ठेकेदारांनी कामाच्या दर्जावर भर द्यावा, अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली.

भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस व अभियंता दिनानिमित्त राहता नगरपरिषद येथील सभागृहामध्ये राहता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी असोशियनच्या फलकाच्या अनावरण डॉक् सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच असोशियनच्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र डॉ विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले .

राहाता नगरपरिषदे येथील सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन यावेळी अध्यक्ष सचिन भाऊ सदाफळ, उपाध्यक्ष श्री. दंडवते, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे साहेब तसेच कैलास सदाफळ तसेच अभियंते, आर्किटेक्ट्स आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

विखे यांनी स्पष्ट संदेश दिला की, “राजकारण आणि ठेकेदारी एकत्र येऊ शकत नाही. पुढारी ठेकेदार होऊ शकत नाहीत. चुकीचं काम करणाऱ्याला कोणतीही माफी नाही

शिर्डी मतदारसंघात मोठ्या संख्येत इंजिनिअर-कॉन्ट्रॅक्टर आहेत. ही संधी कै बाळासाहेब विखे पाटील व विखे कुटुंबाच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाली. माझ्या आजोबांनी शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्या शिक्षणातून बाहेर पडलेल्या तरुणांना आज रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक परिवर्तनात आलेल्या पिढ्यांच्या प्रगतीचा गौरव केला. आज रस्त्यांची इतकी कामं पूर्ण झाली आहेत की कॉन्ट्रॅक्टरला काम मिळवण्यासाठी रस्ते शोधावे लागतात, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी झालेल्या विकासकामांची पावती दिली.

स्थानिकांना संधी देताना अनेक वेळा अंदाजपत्रक किंवा स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये चुका होतात. मात्र, स्थानिकांना प्राधान्य देतानाही गुणवत्ता आणि जबाबदारी जपणं गरजेचं आहे. आपण कितीही पावसाळा आला तरी किमान दोन वर्षे रस्त्याची खडी बाहेर येऊ नये, अशा प्रकारे टिकाऊ आणि दर्जेदार काम व्हायला हवे. डिझाईन करताना वापर, एलिवेशन आणि आधुनिकीकरणच्या गरजा लक्षात घेऊनच काम करावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुढे म्हणाले राहाता शहरात पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, गोदावरी उजवा कालवा कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, आदी प्रकल्पांच्या डिझाईनपासून एलिवेशनपर्यंत सगळ्या बाबी स्वतः ठरवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी 180 कोटी रुपयांचा निधी तत्वतः मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील महिन्यात वर्क ऑर्डर मिळेल

शिर्डी येथील साईबाबां संस्थान च्या शैक्षणिक इमारती उभ्या राहिल्या. त्या संस्थेकडे जातेवेळी रस्त्यावर अतिक्रमण, झाले होते. यावेळी तिथे मटका, दारू असे अवैद्य धंदे चालत होते.सगळे जेसीबी घेऊन अवैध धंदे उध्वस्त केले. यामुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. माझा कार्यकर्ता असो, जवळचा असो, गाडीत बसणारा असो किंवा रोज सोबत फिरणारा असो कोणीही चुकीचं वागलं तर पोलीस कारवाई होणारच, असे सांगून त्यांनी कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचे अधोरेखित केले. त्याचप्रमाणे पोलीस, महसूल, नगरपालिका, अगदी झाडू लावणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, अन्यथा अशा वर्तनाला सहन केलं जाणार नाही, अशी स्पष्ट चेतावनी त्यांनी दिली.

आपल्या मुलांचे भविष्य म्हणजेच त्यांचा रोजगार, आणि तोच खरा विकास असल्याचे सांगत त्यांनी ठेकेदार असोसिएशनमधील प्रत्येक सदस्याने गुणवत्तेने आणि जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe