श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे.
यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच झालेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी केलेले भाऊसाहेब कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.
याद्वारे सूचक शब्दात त्यांच्यावर टीका केली जात आहे. कांबळेच्या विरोधात श्रीरामपूर शहरासह आसपासच्या भागात रात्रीतून अज्ञात व्यक्तींनी फलक लावले. या फलकांवर ‘आमचं ठरलंय, सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं’ असा मजकूर आहे.
त्यामुळे कांबळेंविरोधात आता जाहीर स्वरुपात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याआधीही त्यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्यावर स्थानिक स्तरावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता. पण तो आता थंडावल्यानंतर अचानक बॅनरबाजीतून कांबळेंवर टीका सुरू झाल्याने श्रीरामपूर शहर व परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
- फिट्स कशामुळे येते! अचानक फिट्स आल्यावर काय करायला हवं? जाणून घ्या उपाय आणि लक्षणे
- आनंदाची बातमी ! शिर्डी मधील ‘या’ रस्त्यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणत्या गावांना होणार फायदा? वाचा….
- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि सण अग्रीम वाढला
- १ मेपासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल, या नवीन नियमाबाबत जाणून घ्या सविस्तर!
- अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करायचीय? तर ही वेळ आहे सोनेखरेदीसाठी अत्यंत शुभ, जाणून घ्या सविस्तर!