नदीपात्रात छापा टाकून इतक्या लाखाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथील घोडनदी पात्रात बुधवार दि.4 रोजी सकाळी बेकायदेशीर वाळू उपसा करून चोरून विकण्यासाठी दोन ट्रकमध्ये वाळू भरत असताना बेलवंडी पोलिसांनी नदीपात्रात छापा टाकला व धडक कारवाई करत तब्बल 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना खबर्‍यामार्फत म्हसे ता. श्रीगोंदा येथील घोडनदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

निरीक्षक माने यांनी पोलीस पथक बरोबर घेऊन बुधवार दि.4 रोजी सकाळी नदीपात्रात छापा टाकला. वाळू उपसा करणारे आरोपी

चालक-मालक रंजित आश्रूबा पारखे वय 28 रा. रवळसगाव ता. बीड जि.बीड व सुभाष अभिमान आमटे वय 34 रा.अंजनवस्ती ता. बीड जि.बीड या दोन आरोपींना अटक करून

त्यांच्या ताब्यातील एम एच 12 आर एन 9099 व एम एच 12 एच डी 6566 हे दोन ट्रक जप्त करून एकूण 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment