Pm Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्रातील शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 20 हप्ते देण्यात आले आहेत. याचा विसावा हप्ता 2 ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता.
महत्वाची बाब म्हणजे 21व्या हप्त्याची संभाव्य तारीख देखील समोर आली आहे. अशी सगळी स्थिती असतानाच आता सरकारकडून या योजनेच्या नियमांमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्रातील मोदी सरकारने या योजनेचे नियम थोडेसे शिथिल केलेले आहेत. या नव्या नियमांची केंद्रीय कृषी मंत्री मामा शिवराजसिंह चौहान यांनी माहिती दिली आहे.
कृषी मंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार आता सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीच्या मालकीचे निश्चित दस्तऐवज नाहीत, त्यांनाही आता या अंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे.
म्हणजे या संबंधित जमिनीची मालकी नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा दरवर्षी सहा हजार रुपयाचा फायदा होईल. थोडक्यात ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही पण जे शेती करतात अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
मात्र यासाठी राज्याची पडताळणी बंधनकारक आहे. या वर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्याआधी संबंधित राज्याच्या सरकारने त्यांची पडताळणी करणे बंधनकारक राहील अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नक्कीच या नव्या निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेच्या पुढील हफ्त्याबाबत बोलायचं झालं तर हा हप्ता दिवाळीच्या आधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अद्याप सरकारने कोणतीच माहिती दिलेली नाही. पण दिवाळी सारखा मोठा सण पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात येतील असा अंदाज आहे. यामुळे आता सरकार या योजनेचा पुढील हप्ता कधी वर्ग करते? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.