विकासासाठी निधी आणण्याची धमक लागते: माजी कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- शासन दरबारी वजन वापरुन मोठ्या प्रमाणात मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणण्याची धमक लागते. मी मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने करण्यास ते पुढे सरसावले आहेत.

परंतु त्यांनी मंजूर कामांच्या तारखा पाहून उद्घाटने करावीत. अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांच्यावर केली.

कर्डिले पुढे म्हणाले की, वांबोरी चारीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप सरकारच्या काळात आपण प्रयत्न केले. या योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी वीजपुरवठ्याचे १०० कोटी रुपये थकले होते.

त्यामुळे विद्युत विभागाने वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. पुरवठा खंडित होऊ नये यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून थकलेले १०० कोटी रुपये विद्युत विभागाला देण्यात आले.

राज्यभर सर्वत्र अतिवृष्टीमुळे सर्व गावे पाणीदार झाले. नदी ओढे व तलाव भरून वाहत आहेत. मंत्री महोदय सांगत आहेत, की वांबोरी चारीला पाणी सोडून तलाव भरण्याचे काम केले आहे.

त्याचे जलपूजन करण्यात धन्यता मानत आहेत. सत्तेत असतानाही त्यांचे वडील राहुरीतील प्रश्नासाठी आंदोलनाचा इशाराही देत आहेत. हे दुर्दैवी आहे. प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते.

कांद्याच्या प्रश्‍नासाठी मी व खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न मांडला आहे. कांद्याला हामीभाव देण्यात यावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment