अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जमीन वाटपाच्या दाव्यात मदत केल्याच्या वादातून लोखंडी गज,दांडके व कोयत्याने मारहाण करण्यात आली.याप्रकरणी सहा जणांविरूध्द पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर या मारहाणीत देविदास नाथा लोंढे हे जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी देविदास लोंढे यांनी त्यांचे मेव्हणे भास्कर धांेडिराम कोळेकर यांना जमीन वाटपाच्या दाव्यात मदत केल्याच्या
कारणावरून पांडुरंग आंबुजी कोळेकर,धांेडीराम आंबुजी कोळेकर,भाऊसाहेब धांेडीराम कोळेकर,सोपान पांडुरंग कोळेकर,भागिनाथ पांडुरंग कोळेकर,पोपट अशोक कोेकर (सर्व रा.आडगाव ता.पाथर्डी) यांनी लोंढे
यांना लोखंडी गज,लाकडी दांडके व कोयत्याने हातापायावर,पाटीपोटावर व डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना दि.३ते ४ नोव्हेबर रोजी घडली. याप्रकरणी देविदास लोंढे यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुनहा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास सपोनि पवार हे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved