Post Office Scheme : सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीच्या तयारीत आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची. सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की पहिले नाव ओठांवर येत ते बँकांच्या FD योजनांचे. यानंतर मग गुंतवणूकदार विचार करतात पोस्टाच्या बचत योजनांचा.
दरम्यान जर तुम्हीही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा बचत योजनेची माहिती सांगणार आहोत ज्यात तुम्ही एकदा गुंतवणूक करून पाच वर्षांनी 12 लाख 30 हजार रुपयांचे व्याज मिळू शकणार आहात.

खरे तर पोस्टाकडून शेकडो बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण यातील काही बचत योजना अशा आहेत ज्या की एका विशिष्ट गटातील नागरिकांसाठी सुरू झाल्या आहेत. अशीच एक बचत योजना आहे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम.
ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना सुद्धा यामध्ये गुंतवणूक करता येते.
ती अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच जे स्वेच्छा निवृत्ती घेतात अशा नागरिकांना 55 वर्षानंतर यामध्ये गुंतवणूक करता येते. दरम्यान आता आपण पोस्टात सुरू असणाऱ्या याच सीनियर सिटीजन सेविंग स्कीम बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम बाबत बोलायचं झालं तर यात 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. यावर गुंतवणूकदारांना बँकांच्या एफडी योजनांपेक्षा अधिक व्याज मिळते. सद्यस्थितीला यात गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2% दराने व्याज दिले जात आहे. बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूकदारांना सहा-सात टक्के दराने व्याज दिले जाते.
सामान्य ग्राहकांच्या तुलनेत सीनियर सिटीजन ग्राहकांना नक्कीच बँकांच्या एफडी योजनांमध्ये अधिक व्याज मिळते तरीही पोस्टाच्या या योजनेत जेवढे व्याज दिले जात आहे तेवढे व्याज इतर कोणत्याच बँकांच्या एफडी योजनांमध्ये मिळत नाही. खरे तर आधी या योजनेत गुंतवणूकदारांना फक्त
15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येत होती. मात्र नंतर सरकारने या योजनेची कमाल गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट केली. या निर्णयाचा तमाम सीनियर सिटीजन ग्राहकांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे या योजनेत जॉईंट अकाउंट सुद्धा ओपन करता येते. अर्थात पती-पत्नी दोघांना याचा लाभ मिळू शकतो.
ही योजना पाच वर्षांची आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळते. एकदा पैसा गुंतवला की सलग पाच वर्ष गुंतवणूकदारांना व्याज मिळत राहते. महत्वाची बाब म्हणजे योजनेची मुदत संपली की इच्छेनुसार अर्जदारांना ही योजना पुढे सुरू ठेवता येते.
कसे मिळणार साडेबारा लाख रुपये ?
पोस्टाच्या या योजनेत एखाद्या सीनियर सिटीजन ग्राहकाने 30 लाख रुपये गुंतवले तर त्यांना सध्याच्या 8.2% दराने पाच वर्षात 12 लाख तीस हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. म्हणजेच दर महिन्याला 20500 रुपयांचे व्याज मिळेल. अर्थात वर्षभरात गुंतवणूकदाराला दोन लाख 46 हजार रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहेत.
त्यामुळे जर तुम्हाला ही महिन्याला वीस हजाराहून अधिकची कमाई करायची असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. पण यासाठी तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने या योजनेत नक्कीच रक्कम जमा करायला हवी.