Stock To Buy : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार सुरू आहेत. भूराजकीय तणावांमुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार अस्वस्थ बनलेत. पण या महिन्याची सुरुवात धडाकेदार राहिली आहे. दरम्यान जर तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन शेअर्सची माहिती सांगणार आहोत ज्यातून येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळू शकतो.
ब्रोकरेज मिराई अॅसेट शेअरखान ह्या टॉप ब्रोकरेज फर्मने नुकतेच एक अपडेट दिले आहे. यात त्यांनी गुंतवणूकदारांना असे काही शेअर्स सुचवले आहेत ज्यातून त्यांना येत्या काळात 53% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. दरम्यान आज आपण अशाच शेअर्स पैकी टॉप 3 शेअरची माहिती पाहणार आहोत. या तीन कंपन्यांचे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना प्रचंड मालामाल बनवणार आहे.

Gokaldas Exports – ब्रोकरेजने या शेअर्सला बाय रेटिंग दिली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉकची सीएमपी म्हणजेच करंट मार्केट प्राइस 745 रुपये आहे.
परंतु येत्या काळात या स्टॉकची किंमत चांगलीच वाढू शकते. या शेअर साठी 1140 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. म्हणजेच हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 53% पर्यंत रिटर्न देणार असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
DLF – हा शेअर सध्या 729 रुपयांवर व्यवहार करतोय. पण लवकरच हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवण्याची क्षमता ठेवतो. या शेअर साठी टॉप ब्रोकरेजने 1010 रुपयांची टार्गेट प्राईज सेट करतानाच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर येत्या काळात 39 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणार असल्याचा अंदाज आहे.
Vinati Organics – या यादीतला हा शेवटचा स्टॉक आहे. या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. आज याची सीएमपी 1688 रुपये आहे. पण लवकरच हा स्टॉक 2300 रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.