Share Market News : Accelya Solutions India लिमिटेडकडून आपल्या शेअर होल्डर साठी एक मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्याही कामाची राहणार आहे. खरे तर या आठवड्यात अनेक कंपन्या एक्स डिव्हिडंड ट्रेड करणार आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
अशातच आता Accelya Solutions India लिमिटेड ने सुद्धा आपल्या शेअर होल्डर्स ला लाभांश देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहे.

खरे तर शेअर मार्केट मधील अनेक गुंतवणूकदार ज्या कंपन्या लाभांश देतात किंवा बोनस शेअर ऑफर करतात अशा कंपन्यांवर विशेष लक्ष ठेवून असतात. दरम्यान जर तुम्हीही लाभांशी देणाऱ्या किंवा बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असाल तर या कंपनीचे शेअर्स तुमच्या कामी येणार आहेत.
कारण की या कंपनीने प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. म्हणजेच या कंपनीचा एक शहर असेल तर गुंतवणूकदारांना 40 रुपयांचा अंतरीम लाभांश मिळणार आहे. साहजिकच कंपनीच्या या घोषणेनंतर याचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.
विशेष बाब म्हणजे कंपनीने यासाठीची रेकॉर्ड सुद्धा जाहीर केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार यासाठीची रेकॉर्ड 24 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डरचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्यांना या लाभांशाचा लाभ दिला जाणार आहे.
गुंतवणूकदारांना हा लाभांश 27 नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. खरे तर या वर्षात कंपनीकडून दुसऱ्यांदा लाभांश दिला जात आहे. आधी कंपनीने जानेवारी महिन्यात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 50 रुपयांचा लाभ होऊन देण्याचा निर्णय घेतला होता. आता कंपनी पुन्हा एकदा चाळीस रुपये प्रति शेअर असा लाभांश देणार आहे.
या कंपनीचा स्टॉक 1514.65 रुपयांवर ट्रेड करत असून आज यात एक टक्क्यांची वाढ झालीये. या शेअर्सने गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना 40% रिटर्न दिले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यात या शेअर्सने 22% रिटर्न दिले आहेत. एकंदरीत या कंपनीच्या शेअर्सने लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना फारसा नफा दिलेला नाही असे दिसते.