ई – केवायसी केली नसेल तर लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का ? समोर आली महत्वाची अपडेट

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेता असाल तर नक्कीच बातमी तुमच्यासाठी फारच कामाची ठरणार आहे. ही योजना गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत चा लाभ मिळाला आहे. ऑगस्टचा हप्ता गेल्या सप्टेंबर महिन्यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. यामुळे सप्टेंबर चा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल राज्यातील लाखो लाडक्या बहिणीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.

दुसरीकडे आता योजनेचा लाभ घेण्यासाठी फडणवीस सरकारने काही नियम तयार केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळवायचे असतील तर आता केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे बंधनकारक करण्यात आली आहे. लाभार्थी तसेच लाभार्थ्याचे वडील किंवा पती दोघांनाही केवायसीची प्रक्रिया करावी लागणार आहे.

केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर योजनेचा हप्ता थांबवला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत. असे असतानाच आता सप्टेंबरच्या हप्त्याला उशीर होतोय. यामुळे केवायसी केली नाही तर सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही का सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान केवायसी च्या प्रक्रियेसाठी सरकारकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. केवायसी बाबत जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात परिपत्रक निघाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत केवायसी करावी लागणार असे म्हटले होते.

दुसरीकडे, केवायसी करताना लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. महिलांना OTP एररची अडचण येत आहे. यामुळे सध्या सायबर कॅफे, आपले सेवा केंद्र, आधार केंद्र अशा ठिकाणी योजनेचे लाभार्थी गर्दी करत आहेत. काही गावात आपले सेवा केंद्र नाही म्हणून महिलांना दुसऱ्या मोठ्या गावात जावे लागते.

शिवाय केवायसी ला दोन महिने मुदत आहे यामुळे महिला रात्रभर जागून केवायसी करत आहेत. दरम्यान आता सरकारकडून मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने eKYC बाबत मोठी माहिती दिली आहे. E KYC साठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे पात्र बहिणींना या दोन महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. शिवाय eKYC न झाल्यास सप्टेंबर – ऑक्टोबरचे पैसे थांबवले जातील, असा कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणजेच, पैसे थांबवायचे असतील तर केवायसीची मुदत संपल्यानंतर थांबवले जातील.

नोव्हेंबरपासून कदाचित केवायसी न केलेल्या महिलांचे पैसे थांबवले जाऊ शकतात. कारण या दोन महिन्यांत सरकार eKYC द्वारे पडताळणी करणार आहे. थोडक्यात सप्टेंबर तसेच ऑक्टोबरचा हप्ता eKYC अभावी थांबवण्यात येईल, असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना मिळणार असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News