Hyundai Car Discount Offer : गेल्या महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. सरकारने जीएसटी मध्ये मोठी कपात केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने 4 मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या छोट्या कार्सवरील जीएसटी दहा टक्क्यांनी कमी केली आहे. पूर्वी छोट्या गाड्यांवर 28 टक्के जीएसटी लागत होता.
पण आता या गाड्यांवर फक्त 18% जीएसटी लागतोय. जीएसटीचे नवीन रेट 22 सप्टेंबर पासून सक्रिय आहेत. विशेष म्हणजे जीएसटीमुळे गाड्यांच्या किमती कमी झाल्याच आहेत. यासोबतच आता फेस्टिवल सिझन सुरू असल्याने अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना डिस्काउंट ऑफर सुद्धा देत आहेत.

दरम्यान, आज आपण ह्युंदाई कंपनीची डिस्काउंट ऑफर पाहणार आहोत. दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना कंपनीकडून किती रुपयांचा डिस्काउंट मिळतोय? याबाबत आज आपण डिटेल माहिती जाणून घेऊयात. ह्युंदाईच्या लोकप्रिय गाड्यांवरील डिस्काउंट बाबत आज आपण या लेखात माहिती पाहणार आहोत, यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवा.
तुम्हाला या दिवाळीत नवीन कार खरेदी करायची असेल तर ह्युंदाईची कार खरेदी करायला हवी कारण की तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. आता आपण ऑक्टोबर महिन्यात कोणत्या मॉडेल्सवर किती रुपयांची सूट मिळत आहे याबाबतची माहिती पाहूयात.
Tucson – या गाडीवर 1.41 लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय. ही ऑफर फक्त ऑक्टोबर महिन्यापुरती आहे.
Grand Nios i10 – ऑक्टोबर महिन्यात या गाडीवर ग्राहकांना 75 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात असल्याची माहिती डीलरशिपकडून हाती आली आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला या महिन्यात नवीन कार घ्यायची असेल तर तुम्ही या गाडीचा विचार करायला काही हरकत नाही.
Hyundai Alcazar – ह्युंदाई कंपनीच्या या गाडीवर 60000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
Hyundai Venue – कंपनीच्या या लोकप्रिय एसयुव्ही वर ऑक्टोबर महिन्यात पन्नास हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय.