Pm Kisan Yojana : पंतप्रधान शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा दिला जाऊ शकतो अशा बातम्या आता समोर येत आहेत.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने पंजाब, हिमाचल प्रदेश तसेच हरियाणामधील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21 वा हप्ता वितरित केला होता. या संबंधित राज्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सरकारने त्यांना लवकरच पीएम किसानचा लाभ दिला होता.

आता यापाठोपाठ जम्मू – काश्मीर मधील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत या योजनेचा चार राज्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तसेच उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांना देखील लवकरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
कदाचित दिवाळीच्या आधी या योजनेचा सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात साजरा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण वीस हप्ते देण्यात आले आहेत.
तसेच 21 वा हप्ता पंजाब, हिमाचल प्रदेश हरियाणा या राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी देखील या योजनेचा 21 वा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर या योजनेचा पुढील हप्ता मिळू शकतो अशा चर्चा सुरू आहेत.
सरकार दिवाळीच्या आधी देशभरातील सर्वच राज्यांमधील शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ देण्याची योजना आखत असल्याचे बोलले जात आहे. नक्कीच दिवाळीच्या आधी या योजनेचा लाभ मिळाला तर देशभरातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होईल अशी आशा आहे.
पण, यासंदर्भात अजून सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तरीही चार राज्यांमधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनाही दिवाळीच्या आधी याचा लाभ मिळेल अशी आशा आहे.