Maruti Suzuki Price Drop : तुमचंही नवीन कार घेण्याच स्वप्न आहे का ? मग यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमचं स्वप्न स्वस्तात पूर्ण करू शकता. खरेतर गेल्या महिन्यात केंद्रातील सरकारकडून जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. सरकारने छोट्या गाड्यांवरील जीएसटी 18 टक्के केलाय. अर्थात यात 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
यामुळे छोट्या गाड्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. सरकारने चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांच्या किमतीत कपात केली आहे. याशिवाय फेस्टिवल पिरियड सुरू असल्याने अनेक ऑटो कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हजारो रुपयांचा डिस्काउंट ऑफर सुद्धा देत आहेत.

यामुळे ग्राहकांना फारच कमी किमतीत नवीन कार खरेदी करता येणे शक्य होत आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी सरकारचा निर्णय नक्कीच मोठा दिलासादायी ठरतोय. जीएसटी कपातीनंतर वॅगनार सुद्धा स्वस्त झालीये. त्यामुळे दिवाळीत ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.
तेव्हापासून आत्तापर्यंत या गाडीची क्रेझ मध्यमवर्गीयांमध्ये कायम आहे. उत्तम मायलेज देत असल्याने मध्यमवर्गीय ही गाडी खरेदीला नेहमीच प्राधान्य देतात. आता जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे या गाडीची किंमत पाच लाखांच्या आत आली आहे. जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे WagonR चे बेस्ट व्हेरिएंट सर्वाधिक स्वस्त झाले आहे.
या लोकप्रिय हॅचबॅकच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 77 हजार रुपयांपर्यंत कमी झाली आहे. ही गाडी ग्राहकांना पेट्रोल तसेच पेट्रोल प्लस सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल सीएनजी व्हेरिएंटच्या किमती कंपनीने 80 हजारापर्यंत कमी केल्या आहेत.
मायलेज किती देते ?
मॅन्युअल व्हेरिएंट (पेट्रोल) – 24.35 किलोमीटर / प्रति लिटर
ऑटोमॅटिक व्हेरिएंट (पेट्रोल) – 25.19 किलोमीटर
सीएनजी व्हेरिएंट – 34.05
ग्राहकांचा किती फायदा होणार?
आधी गाडीची बेस व्हेरिएंटची किंमत पाच लाख 79 हजार होती. आता चार लाख 99 हजार रुपये झाली. अर्थात ग्राहकांचे तब्बल 80 हजार रुपये वाचतील. येथे सांगितलेली किमत एक्स शोरूम आहे.