आनंदाची बातमी ! Kotak Mahindra Bank ‘या’ विद्यार्थ्यांना देणार दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती 

Published on -

Educational News : बारावीत शिक्षण घेणाऱ्या तसेच बारावी उत्तीर्ण होऊन पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप योजना राबवल्या जातात. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आपापल्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक मदत पुरवत असते.

सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे नक्कीच मोठा फायदा होतो. पण सरकार सोबतच काही सामाजिक संस्था सुद्धा विद्यार्थ्यांना मदत करतात. एवढेच काय तर विद्यार्थ्यांसाठी कोटक महिंद्रा बँक सुद्धा एक विशेष योजना राबवत आहे ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पुरवली जाते.

कोटक महिंद्रा फाउंडेशन मार्फत ही स्कॉलरशिप दिली जात असून आज आपण याच स्कॉलरशिप योजनेबाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत. कोटक महिंद्रा बँकेच्या कोटक महिंद्रा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते.

पण ही योजना फक्त मुलींसाठी सुरू आहे. कोटक कन्या स्कॉलरशिप असे या योजनेचे नाव याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थिनींना दीड लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळते. ज्या मुली बारावी वर्गात 75% पेक्षा अधिक गुण मिळवतात आणि एमबीबीएस, एलएलबी, BS/MS, डिझाईन, आर्किटेक्चर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात त्यांनाच या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.

मुलींना व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवृत्त करण्यासाठी कोटक महिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्कॉलरशिप योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी ज्या विद्यार्थिनी पात्र ठरतात त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दीड लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळते.

या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम विद्यार्थिनींना शिक्षण वस्तीगृहशुल्क इंटरनेट वाहतूक लॅपटॉप पुस्तके व इतर स्टेशनरी सामान खरेदीसाठी वापरता येते. महत्त्वाची बाब म्हणजे महिंद्रा फाउंडेशन कडून राबवले जाणारी ही स्कॉलरशिप योजना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सुद्धा सुरू आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून या योजनेसाठी अधिकाधिक मुलींनी अर्ज करावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

ह्या योजनेसाठी https://www.buddy4study.com/page/kotak-kanya-scholarship येथे जाऊन पात्र व गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाईन अँप्लिकेशन सादर करतांना आवश्यक कागदपत्र सुद्धा अपलोड करायची आहेत. 

कोण कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात?

HSC चे मार्कशीट  

इनकम सर्टिफिकेट 

कॉलेजची फी रचना 

चालु बोनाफाईड 

आधार कार्ड 

बँक पासबुक 

पासपोर्ट फोटो 

घराचे फोटो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe