‘या’ 5 कंपन्या गुंतवणूकदारांना देणार बोनस शेअर्स! रेकॉर्ड डेट कधी ? 

Published on -

Bonus Share : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर अलीकडे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळत असल्याने अनेकजण यात गुंतवणूक करत आहेत.

विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कॉर्पोरेट बेनिफिट सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. बोनस शेअर्स, डिव्हीडंट असे कॉर्पोरेट लाभ कंपन्यांकडून जाहीर केले जात आहेत.

दरम्यान आज आपण अशा 5 कंपन्यांबाबत माहिती पाहणार आहोत ज्या की गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स ऑफर करत आहेत. यामुळे जर तुम्हालाही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्टमेंट करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे.

खरे तर कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या बोनस शेअरचा लाभ घ्यायचा असेल तर रेकॉर्ड डेट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण की, रेकॉर्ड डेटच्या आधी ज्या शेअर होल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतात त्यांनाच कॉर्पोरेट बेनिफिट मिळतो.

दरम्यान, आजचा दिवस 5 कंपन्यांचे बोनस शेअर्स मिळवण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून अर्थात 10 ऑक्टोबर पासून शेअर मार्केट मधील काही कंपन्यांचे शेअर्स एक्स बोनस म्हणून ट्रेड होणार आहेत.

दरम्यान आज आपण उद्यापासून एक्स बोनस म्हणून ट्रेड होणाऱ्या 5 शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. अर्थात जर तुम्हाला या कंपन्यांचा बोनस शेअरचा लाभ घ्यायचा असेल तर आजच कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. 

या कंपन्या देणार बोनस शेअर्स 

Upsurge Seeds Of Agriculture – ही कंपनी सात शेअर्स मागे तीन बोनस शेअर्स देणार आहे.

व्हॅलियंट कम्युनिकेशन्स – ही कंपनी दोन शेअर्स मागे एक बोनस शेअर देणार आहे.

उजास एनर्जी – एक शेअर मागे दोन मोफत शेअर

प्युरिटी फ्लेक्स पॅक – ही कंपनी सुद्धा गुंतवणूकदारांना एक शेअर मागे दोन बोनस शेअर देणार आहे.

लक्ष्मी गोल्डर्ना हाऊस – ही कंपनी पाच शेअर्स मागे सात नवीन बोनस शेअर देणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe