लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकाच वेळी मिळणार का ? सरकारने दिली मोठी अपडेट

Published on -

Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच पंधरावा हफ्ता देखील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार अशी माहिती मिळेल रिपोर्ट मधून समोर आलीये.

योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलाय. यामुळे सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये येणार हे पक्क होत. यानुसार आता फडणवीस सरकारकडून सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाकडे सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय पण जारी झालाय. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने काल 8 ऑक्टोबर 2025 रोजी एक जीआर जारी केला.

जीआर मध्ये 410 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या पुढील हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलीये. पण गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येतील अशा चर्चा सुरू आहेत.

त्यामुळे आता खरंच सप्टेंबरच्या हप्त्यासोबत ऑक्टोबरचा पण हप्ता दिला जाणार का? याबाबत आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून महिला व बाल विकास विभागाकडे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींना दिले जाणार नाहीत हे फिक्स झाले आहे. शासनाने फक्त सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग केला आहे. जेव्हा ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी सुद्धा निधी वर्ग होईल तेव्हाच ऑक्टोबर चा पैसा प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे.

यामुळे दिवाळीच्या आधी फक्त लाडक्या बहिणींना सप्टेंबरचाचं हफ्ता मिळेल आणि दिवाळी झाली की मग कदाचित ऑक्टोबरचा हप्ता दिला जाईल. सरकारने सप्टेंबरच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असला तरी देखील अद्याप लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळालेला नाही. पण येत्या काही दिवसात प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe