Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना आता लवकरच सप्टेंबर चा हप्ता मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला 410 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
लाडकी बहिण योजनेच्या पंधराव्या हफ्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला बाल विकास विभागाला हा निधी देण्यात आला असून आता लवकरच पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेचा पैसा मिळणार आहे.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा पैसा सोबतच दिला जाणार अशा चर्चा होत्या. पण सरकारकडून यावेळी फक्त महिलांना सप्टेंबरचाच हफ्ता मिळेल असे संकेत मिळत आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक हॅन्डलवर याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले आहे. अर्थात पुढील दोन-तीन दिवसात राज्यातील सर्वच महिलांना या योजनेचा पैसा मिळणार आहे. परंतु यावेळी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित जमा होणार नसल्याचे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते.
दरम्यान त्यांनी राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुद्धा आवाहन या ठिकाणी केले आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत लाभ मिळाला आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 14 हप्ते मिळाले आहेत आणि आजपासून पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली आहे.
यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदतही दिली आहे. यामुळे मुदतीत महिलांना केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केली नाही तर महिलांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. सप्टेंबर चा हप्ता मात्र केवायसी न केलेल्या महिलांनाही मिळेल यामुळे चिंता करू नये पण लवकरात लवकर केव्हाही करून घ्यावी.
मंत्री अदिती तटकरे यांनी काय सांगितल?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !