Share Market गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी! दिवाळीपूर्वी ‘हे’ तीन शेअर्स खरेदी करा, 59% रिटर्न मिळणार 

Published on -

Stock To Buy : दिवाळी आता जवळ आली आहे. 21 ऑक्टोबर पासून दिवाळीचा सण साजरा होईल. दरम्यान दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन बनवत असतो. तुमचाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

खरंतर आता शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जाणार आहेत. यामुळे आतापासूनच शेअर्समध्ये हालचाली सुरू झाल्या आहे. काही शेअर्स तेजीत आले आहेत तर काही शेअर्स मंदीत जातायेत.

अशातच आता टॉप ब्रोकरेज फर्मने असे 3 शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे जे की लॉंग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतात. बाजारातील सध्याची स्थिती पाहता गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी असे ब्रोकरेजकडून सांगितले जात आहे.

ज्या कंपन्यांचे फंडामेंटस मजबूत आहे, कर्ज कमी आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला जातोय. ब्रोकरेज मिराई अॅसेट शेअरखानने सुद्धा नुकतेच एक अपडेट दिले आहे. यात ब्रोकरेज फर्मने टॉप 5 शेअर्स सुचवले आहेत.

दरम्यान आता आपण या ब्रोकरेजकडून सांगितल्या गेलेल्या या शेअर्स पैकी तीन शेअर्सची माहिती पाहणार आहोत. हे टॉप तीन शेअर्स असे आहेत जे की गुंतवणूकदारांना येत्या काळात जवळपास 60 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात.  

हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न 

Varun Beverages – टॉप ब्रोकरेजकडून हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या स्टॉकसाठी बाय रेटिंग देतानाच 688 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 434 रुपये आहे. अर्थात सीएमपीचा विचार केला असता या शेअर्स मधून येत्या काळात गुंतवणूकदारांना 59% रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

LTTS – या शेअर साठी देखील ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. सध्या या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 4231 रुपये आहे. पण यासाठी 6500 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 54% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात. 

Five Star Business Finance – या कंपनीचे शेअर्स देखील येत्या काळात गुंतवणूकदारांना दमदार परतावा देण्याची क्षमता ठेवतात. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 524 रुपये आहे. पण या स्टॉक साठी 728 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 39 टक्क्यांचे रिटर्न मिळू शकतात असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News