Tata ची ‘ही’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तिमाही निकाल जाहीर होताच डिव्हीडंड देण्याची घोषणा 

Published on -

Tata Stock : बोनस शेअर्स तसेच डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट लाभ उपलब्ध करून देत असतात. हे कॉर्पोरेट लाभ मग गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरतात.

दरम्यान जर तुम्ही ही अशाच कॉर्पोरेट लाभांच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस कडून एक गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर आता तिमाही निकालांचा सिझन सुरू झाला आहे. कंपन्यांनी आपले दुसरे तिमाही निकाल जाहीर करण्यास सुरवात केली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस टीसीएसने सुद्धा आपले दुसरे तिमाही निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात कंपनीचा एकत्रित नफा काहीसा कमी झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला 12,760 रुपयांचा एकत्रित नफा झाला.

पण दुसऱ्या तिमाहीत कंपनीला फक्त 12 हजार 75 कोटी रुपये इतका एकत्रित नफा झाला आहे. म्हणजेच मागील तिमाही पेक्षा या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा मोठ्या प्रमाणात कमी झालाय. पण तरीही तिमाही निकाल जाहीर करताना टीसीएस कंपनीने आपल्या शेअर होल्डर साठी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे.

टीसीएस कंपनीकडून प्रत्येक शेअरवर 11 रुपयांचा लाभांश दिला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. टीसीएसने त्याची रेकॉर्ड सुद्धा निश्चित केली आहे. या रेकॉर्ड डेट पर्यंत ज्या शेअर होल्डर्स कडे कंपनीच्या शेअर्स असतील त्यांनाच हा कॉर्पोरेट लाभ मिळणार आहे.

खरे तर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. यात संचालकांनी कंपनीच्या 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरमागे 11 रुपयांचा दुसरा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. पण यासाठीची रेकॉर्ड डेट 15 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

अर्थात या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये ज्या शेअर होल्डर चे नाव असेल त्यांनाच लाभांश दिला जाणार आहे. दरम्यान कंपनीकडून दिला जाणारा हा लाभ चार नोव्हेंबर 2025 रोजी प्रत्यक्षात शेअर होल्डर्सला मिळणार आहे.

नक्कीच टीसीएस कंपनीची ही घोषणा शेअर मार्केट मधील कॉर्पोरेट लाभाच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी फायद्याची ठरणार आहे. तुम्ही सुद्धा शेअर मार्केट मधून अशाच प्रकारचे कॉर्पोरेट लाभ घेण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला 15 ऑक्टोबरच्या आधी टीसीएस मध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News