Diwali Bonus : तुम्ही पण दिवाळी बोनसची वाट पाहतात का? मग बोनस खात्यात क्रेडिट होण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्ताने बोनसची भेट दिली जात असते. दरवर्षी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कंपन्या मोठा बोनस जाहीर करतात.
जसे की गेल्या वर्षी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्राधिकरणाकडून 29 हजार रुपयांचा बोनस देण्यात आला होता. दरम्यान यावर्षी कर्मचारी संघटनांकडून मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये बोनस मिळायला हवा अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होऊ शकतो. आजचा आपला विषय कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या दिवाळी बोनसचा आहे. कर्मचाऱ्यांना जो बोनस दिला जातो तो करमुक्त असतो असा अनेकांचा समज आहे.
पण प्रत्यक्षात आयकर विभागाचे नियम काही औरच सांगतात. आयकर विभागाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना दिला जाणारा बोनस हा करमुक्त नसतो अर्थात बोनस वर सुद्धा कर्मचाऱ्यांना कर भरावा लागतो.
दरम्यान आता आपण कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळाला की त्यांना कर भरावा लागतो आणि किती बोनस मिळाला तर त्यांना कर भरावा लागत नाही. अर्थात याच्या मर्यादा कशा आहेत याचाच आढावा आजच्या या लेखातून घेणार आहोत.
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट व्हाऊचर, रोख रक्कम, मिठाई किंवा मग कपडे अशा कोणत्याही माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देऊ शकते. काही कंपन्या तर कर्मचाऱ्यांना महागड्या गाड्या आणि मोबाईल सुद्धा भेट देतात.
पण कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिलेली भेटवस्तू पाच हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची असेल तर आयकर विभागाच्या नियमानुसार अशा बोनस वर सुद्धा कर भरावा लागतो. थोडक्यात बोनसची रक्कम किंवा बोनस्वरूपी देण्यात आलेल्या भेटवस्तूची किंमत ही पाच हजार रुपयांच्या आत असेल तर आयकर विभागाकडून कोणताच कर वसूल केला जाणार नाही.
पण जर ही रक्कम 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर कर भरावा लागणार आहे. बोनस स्वरूपात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूची जसे की मोबाईल म्हणा किंवा इतर महागड्या ज्वेलरी म्हणा यांच्या किमती 5000 पेक्षा अधिक असतील तर त्याच्या संपूर्ण मूल्यावर कर भरावा लागत असतो.
कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात किंवा अक्षय तृतीयेच्या काळात किंवा मग इतर कोणत्याही सणासुदीच्या काळात जो बोनस दिला जातो तो बोनस हा कर्मचाऱ्यांचा पगाराचाच भाग आहे असे आयकर विभाग मानते. यामुळे दिवाळीच्या काळात जो रोग बोनस तुम्हाला मिळतो तो रोख बोनस तुमच्या वार्षिक उत्पन्नात ऍड केला जातो.
अशा स्थितीत जर कर्मचाऱ्यांनी बोनस बाबत आयकर रिटर्न मध्ये उल्लेख केला नाही तर कर चुकवल्याबद्दल नोटीस येणे स्वाभाविक आहे. यामुळे आयकर रिटर्न्स सादर करताना बोनसची रक्कम मेन्शन करायला विसरू नका.
दरम्यान बोनसची रक्कम ही वार्षिक उत्पन्नात ऍड होत असल्याने तुम्ही ज्या टॅक्स लॅब मध्ये बसत असाल त्या टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला बोनसवर कर भरावा लागेल. दरम्यान आयकर विभागाच्या नव्या प्रणालीनुसार आता बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर 60000 रुपयांची सवलत दिली जात आहे.