Royal Enfield : आता ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड सगळीकडे पसरला आहे. किराणा सामान असो किंवा कपडे आता सारं काही घरबसल्या मागवता येत. विशेष म्हणजे आवडलं नाही तर परतही करता येतं. या ऑनलाइन शॉपिंग साईटच नेटवर्क गेल्या काही वर्षांमध्ये फार अधिक वाढलंय.
आता ग्रामीण भागातही हा ट्रेंड आपले पाय पसरविताना दिसतोय. अगदीच खेड्यापाड्यात सुद्धा आता अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या साईटवरून शॉपिंग केली जात आहे. दरम्यान आता या ऑनलाइन शॉपिंगचा वाढलेला ट्रेंड पाहता रॉयल एनफिल्ड कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता रॉयल एनफिल्डच्या काही बाईक ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत. फ्लिपकार्ट अमेझॉन अशा शॉपिंग साइटवरून ग्राहकांना RE बाईक खरेदी करता येतील. अर्थात आता बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना शोरूमवर जाण्याची गरजच राहिलेली नाही. कारण की, कंपनीच्या बाईक्स आता थेट ऑनलाइन ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध झाल्या आहेत.
रॉयल एनफिल्ड कंपनीने यासंदर्भात डिटेल माहिती दिली आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे ब्रँडच्या सर्व 350cc च्या गाड्या आता ई-कॉमर्स साइटवर विक्रीसाठी सूचीबद्ध झाल्या आहेत. 350 सीसी सेगमेंट मधील क्लासिक, बुलेट, हंटर, नवीन Meteor, गोअन क्लासिक हे मॉडेल्स अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
अर्थातच ग्राहकांना ऑनलाईन रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करायची असल्यास आता तो पर्याय सुद्धा उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना गाडी घरपोच उपलब्ध होणार आहे. मात्र सुरुवातीला ही सुविधा काही मोजक्याच शहरांमध्ये मिळणार आहे.
या शहरातील नागरिकांना अमेझॉनवर मिळणार सुविधा
अहमदाबाद
चेन्नई
हैदराबाद
दिल्ली
फ्लिपकार्टवर या ग्राहकांना मिळणार सुविधा
मुंबई
बेंगलोर
कोलकाता
गुरुग्राम
लखनऊ
महत्वाची बाब म्हणजे ऑनलाइन बाईक खरेदी करण्यात आली असली तरी देखील ग्राहकांना खरेदीनंतर सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. बाईकची डिलिव्हरी कंपनी करणार आहे.
तसेच गाडीची सर्विसिंग व इतर सर्व कामे डीलरशिपवर होतील. कंपनीच्या या निर्णयामुळे साहजिकच गाड्यांचा खप वाढणार आहे. याशिवाय ग्राहकांना देखील सणासुदीच्या काळात मोठा डिस्काउंट ऑफरचा लाभ मिळू शकतो.