UPI Payment : तुम्ही फोन पे गुगल पे अशा पेमेंट एप्लीकेशन चा वापर करता का? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर अलीकडे सगळीकडे यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट केले जात आहे. साधा भाजीपाला खरेदी करायचा असेल तरीसुद्धा आता ऑनलाईनने पेमेंट केले जात आहे. यामुळे कॅशलेस इकॉनोमीला चालना मिळाली आहे.
कधीकाळी भारतात डिजिटल पेमेंट फारस यशस्वी होणार नाही असं म्हटलं जात होतं. पण आज रोजी देशात सगळीकडे डिजिटल पेमेंट स्वीकारले जात आहे आणि याचा सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतायेत. यूपीआय पेमेंट एवढेच सोपा आणि सुरक्षित बनले की आता साऱ्यांनाच याचं वेड लागलंय.

यूपीआय पेमेंटचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे खिशात फारसे पैसे घेऊन फिरावं लागत नाही. कोणालाही पैसे पाठवायचे असतील तर एका क्लिकवर पाठवता येतात. पैसे दवडण्याची भीती तसेच चोरी होण्याची भीती काही राहिलेली नाही. पण युपीआयने पेमेंट करायचे असेल तर मोबाईल लागतोच.
मात्र यूपीआय पेमेंटचे भविष्य फारच उज्वल आणि आशादायी आहे. कारण की आता युपी आईने पेमेंट करण्यासाठी मोबाईलची गरजच भासणार नाही. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण आता यूपीआय पेमेंट चष्म्याद्वारे सुद्धा होऊ शकत.
मिळालेल्या माहितीनुसार आता यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना वेरिबल स्मार्ट ग्लासेस अर्थात स्मार्ट चष्म्याच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करता येणार आहे. यासाठी यूपीआय लाईट वापरावे लागेल. युजर्सला चष्म्याच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून फक्त डिवाइसला व्हॉइस कमांड द्यायची आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी स्वतःही माहिती दिली आहे. प्राधिकरणाने सांगितल्याप्रमाणे, चष्म्याद्वारे पेमेंट करण्यासाठी कोणताही स्मार्टफोन लागणार नाही तसेच हे पेमेंट करताना पिन टाकण्याची सुद्धा गरज भासणार नाही.
अलीकडेच एक फिनटेक फेस्टिवल संपन्न झाला यात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी या नव्या सुविधेची घोषणा केली. UPI Lite छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
वेरेबल स्मार्ट ग्लासद्वारे पेमेंट करण्याची ही सुविधा बँकांसाठी देखील महत्त्वाची ठरू शकते. कारण की नॉन सीबीएस वॉलेट ट्रांजेक्शनच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्यवहार होणार आहेत. त्यामुळे साहजिकच बँकांवरील ताण कमी होणार आहे.