Bonus Share : सध्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालासोबतच अनेक कंपन्या आपल्या शेअर होल्डर्सला कॉर्पोरेट बेनिफिट सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. काही कंपन्या तिमाही निकाल सार्वजनिक करतानाच कॉर्पोरेट लाभाची घोषणा करत आहेत.
दरम्यान बोनस शेअर्स किंवा डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Concord Control Systems या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे पुढील आठवड्यात कंपनी एक्स बोनस ट्रेड करणार असल्याची माहिती समोर आलीये. खरे तर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या सहा महिन्यांच्या काळात जबरदस्त रिटर्न दिले आहेत. सहा महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांच्या एका लाखाचे दोन लाख रुपये बनवले आहेत.
यामुळे सध्या हा स्टॉक फोकस मध्ये आला आहे. दरम्यान आता आपण कंपनीने जाहीर केलेल्या बोनस शेअरची डिटेल माहिती पाहणार आहोत. कंपनीने बोनस शेअर इशू साठी रेकॉर्ड डेट काय निश्चित केली आहे आणि गुंतवणूकदारांना किती शेअर्स बोनस मिळणार याबाबत आता आपण माहिती पाहूयात.
रेकॉर्ड डेट काय आहे?
Concord कंट्रोल सिस्टम्स दहा रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या पाच शेअर्सवर तीन बोनस शेअर देणार आहे. अर्थात रेकॉर्डडेट आधी ज्या शेअर होल्डर्स कडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना या कॉर्पोरेट बेनिफिटचा लाभ मिळणार आहे. खरे तर ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच बोनस शेअरची भेट देणार आहे.
यासाठी कंपनीने 16 ऑक्टोबर ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. बोनस शेअरच्या घोषणेमुळे कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत. आता आपण या स्टॉकची शेअर मार्केट मधील कामगिरी कशी राहिली आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
सहा महिन्यात पैसे झालेत डबल
गेल्या तीन महिन्यांच्या काळात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50% रिटर्न मिळाले आहेत. तसेच सहा महिन्यात कंपनीचे शेअर्स 150 टक्क्यांनी वाढले आहेत. पण गेल्या एका वर्षाच्या काळात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फक्त 55% रिटर्न मिळाले आहेत. पण गेल्या तीन वर्षांच्या काळात यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 2229% रिटर्न मिळाले आहेत.