Car Selling : तुम्ही जुनी गाडी विकून नवीन गाडी घेणार आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. गाडी विकताना ग्राहकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. वाहन विक्री केल्यानंतर अनेक लोक नोंदणी प्रमाणपत्र नव्या मालकाला ट्रान्सफर करत नाहीत. पण गाडी विकताना ही चूक केल्यास मोठ नुकसान सहन करावे लागू शकते.
वाहन विकल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र जुन्याच मालकाच्या नावावर असल्यास वाहन विक्रीनंतर झालेल्या रस्ते अपघातात जुना मालकच दोषी ठरणार आहे. जुना मालक अशा रस्ते अपघाताच्या कायदेशीर जबाबदारीतून सुटू शकत नाही असा महत्त्वाचा निकाल केरळ हाय कोर्टाने नुकताच दिला आहे.

खरे तर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जुन्या वाहनांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान जुने वाहन खरेदी विक्री करणाऱ्या प्रत्येकाचा ग्राहकांसाठी हायकोर्टाचा हा निकाल मोठा महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 2006 साली केरळमध्ये दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
पण या एक्सीडेंटमधील टूव्हिलर जुन्या मालकाच्या नावानेच रजिस्टर होती. नवीन मालकाने आरटीओ मध्ये जाऊन औपचारिक हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. दरम्यान मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने मृत व्यक्तीला तीन लाख 70 हजार 810 नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला.
विशेष म्हणजे ही नुकसान भरपाई जुना मालक आणि चालक दोघांनाही देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिलेत. यावर जुन्या मालकाने हायकोर्टात अपील केली. या प्रकरणात माननीय हायकोर्टाने ज्या व्यक्तीच्या नावावर गाडीची नोंदणी आहे तोच मालक मानला जाईल आणि अपघाताची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच आहे असे स्पष्ट केले.
तसेच याप्रकरणी माननीय न्यायालयाने जुन्या मालकाला आधी संबंधिताला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले तर आणि मग नव्या मालकाकडून कायदेशीर प्रक्रिया द्वारे नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याची मुभा त्याला दिली. या निर्णयामुळे वाहन विक्री करताना गाडीचे रजिस्ट्रेशन नव्या मालकाच्या नावावर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होते.