Diwali Offer : नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. खरेतर दिवाळीमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. ऑटो मेकर्स दिवाळीत ग्राहकांना लाखो रुपयांचा डिस्काउंट देत आहेत. खरे तर गेल्या महिन्यात सरकारने छोट्या गाड्यांवरील जीएसटी कमी केली.
याचा सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होतोय. याशिवाय सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांकडून गाड्यांच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत. कंपन्या आपल्या लोकप्रिय गाड्यांवर हजारो रुपयांचा डिस्काउंट देत आहेत.

मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडने आपल्या प्रीमियम एसयूव्ही ग्रँड विटारावर सुद्धा डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. आता ऑक्टोबर महिन्यासाठी नेक्सा डीलरशिपमार्फत या गाडीवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
त्यामुळे ज्यांना दिवाळीत नवीन एसयूव्ही घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी राहणार आहे. ही एसयूव्ही खरेदीची योजना आखणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी ही ऑफर फायद्याची ठरणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटवर तब्बल १.८० लाखांची बंपर सूट दिली जात आहे. पेट्रोल व्हेरिएंट खरेदीदारांना १.५० लाखांपर्यंत लाभ मिळणार आहे. याशिवाय ५७,९०० किंमतीचा डोमिनियन एडिशन अॅक्सेसरी पॅक पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे.
सीएनजी व्हेरिएंटवर सुद्धा ४०,००० पर्यंतचा फायदा मिळणार आहे. या ऑफरमुळे ग्रँड विटारा गाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. तिला टोयोटाच्या अर्बन क्रूझर हायराइडरसारखे पॉवरफुल इंजिन मिळते. ही गाडी हायब्रिड तंत्रज्ञानावर आहे.
पेट्रोल इंजिनसोबत असलेली इलेक्ट्रिक मोटर केवळ अतिरिक्त पॉवर देत नाही तर स्वतःच बॅटरी चार्ज करण्याची क्षमताही ठेवते. कंपनीने ही SUV प्रति लिटर २७.९७ किमी मायलेज देऊ शकते. तसेच एका फुल टँकमध्ये जवळपास १२०० किमीचा प्रवास करू शकते अशी माहिती दिलीये. याच्या बेस मॉडेलची किंमत १०.७६ लाख आहे.