दिवाळीत कार खरेदी करणे झाले सोपे ! ‘या’ 5 बँकांकडून मिळणार सर्वात स्वस्त कार लोन

Published on -

Diwali Car Loan : दिवाळीत नवीन गाडी खरेदी करणार असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार असेल.

खरंतर केंद्रातील सरकारने 4 मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या छोट्या चार चाकी वाहनांच्या जीएसटी मध्ये कपात करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या छोट्या वाहनांवरील जीएसटी आता 18% केलाय.

यामुळे वाहन विक्रीत झपाट्याने वाढ होत असून अनेक जण नवीन कार घेण्याच्या तयारी दिसतायेत. येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि दिवाळीला देखील अनेक जण नवीन गाडी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला ईएमआयवर कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी कोणत्या टॉप 5 बँका ग्राहकांना स्वस्तात कार लोन देत आहेत याची माहिती देणार आहोत.

खरे तर यावर्षी जीएसटी च्या कपातीमुळे गाड्यांच्या किमती आधीच कमी झाल्याशिवाय कार कंपन्या देत असलेल्या आकर्षक सवलती देखील ग्राहकांना कार खरेदीसाठी प्रवृत्त करत आहेत.

दुसरीकडे सरकारी बँका देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमीत कमी व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा मिळतोय.

आता आपण कोणत्या बँका सर्वात कमी व्याजदरात कार्लोअन उपलब्ध करून देतायेत याची माहिती जाणून घेऊयात.

UCO – व्याजदर 7.60% ते 10.25%, प्रक्रिया शुल्क 0.50 टक्के किंवा पाच हजार रुपये 

Canara Bank – व्याजदर 7.70% – 11.70%, प्रक्रिया शुल्क 0.25 टक्के.

बँक ऑफ महाराष्ट्र – व्याजदर 7.70% – 12%, प्रक्रिया शुल्क 0.25% किंवा 15 हजार रुपये.

युनियन बँक ऑफ इंडिया – व्याजदर 7.80% – 9.70%, प्रक्रिया शुल्क 0 आहे. 

Indian Overseas Bank – व्याजदर 7.80% – 12%, प्रक्रिया शुल्क 0.50% किंवा 500 ते 5,000 रुपये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe