Zodiac Sign : ऑक्टोबरचा दुसरा पंधरवाडा काही लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. या काळात दिवाळी साजरा होणार आहे. हा दीपोत्सव काही लोकांसाठी विशेष लाभाचा ठरणार आहे. दिवाळीपासून काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. दिवाळीपासून अर्थात 20 ऑक्टोबरपासून शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. हा ग्रह संपत्ती तसेच समृद्धीचा कारक ग्रह म्हणून ओळखला जातो.
यामुळे या ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सर्वच लोकांवर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान हा ग्रह दिवाळीच्या दिवशी कन्या राशीत परिवर्तन करणार आहे. या परिवर्तनामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही लोकांना मोठे सकारात्मक रिजल्ट पाहायला मिळतील.

वृश्चिक राशी – या लोकांचा वाईट काळ लवकरच संपणार आहे. नवीन राजयोग या लोकांचे उत्पन्न वाढवणार आहे. या काळात या लोकांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढणार आहे. नवीन करिअरच्या संधी सुद्धा निर्माण होणार असे बोलले जात आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची भेट मिळेल.
बिजनेस मध्ये कार्यरत असणाऱ्यांचा नफा वाढेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अधिक लाभाचा ठरू शकतो. या लोकांना नवीन इनकम सोर्स मिळतील. नोकरीच्या ठिकाणी नेतृत्वाची संधी मिळू शकते. परदेश वारी घडू शकते.
कन्या – नीचभंग राजयोग या लोकांसाठी सर्वात जास्त अनुकूल ठरू शकतो. दिवाळीपासून या लोकांचे व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा या लोकांना पाहायला मिळतील. जे लोक अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव येतील.
वैवाहिक जीवन सुखकर होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. तरीही यशाला कोणताचं शॉर्टकट राहणार नाही. जे लोक मेहनत घेतायत ते शंभर टक्के यशस्वी होतील. या लोकांच्या आरोग्यात चांगले सकारात्मक बदल दिसतील. समाजातील मानसन्मान वाढेल.