Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आत्तापर्यंत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 15 हप्ते मिळाले आहेत.
योजनेचा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. सप्टेंबर चा हप्ता ऑक्टोबर मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. दरम्यान लाडक्या बहिणींना लाभासाठी केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

यासाठी सरकारकडून दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच दरवर्षी केवायसी करावी लागणार असेही आदेश आहेत. मात्र लाडक्या बहिणींना सध्या केवायसी करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातल्या त्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी पूरस्थिती तयार झाली होती आणि याचाही लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला होता.
पूरस्थितीमुळे अनेक दिवस लाडक्या बहिणींना केवायसी करता आले नाही. अशातच आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. खरे तर दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींना सप्टेंबर चा हप्ता देण्यात आला.
दरम्यान आता लाडक्या बहिणींना आणखी एक दिवाळी भेट मिळणार आहे. सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियाबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून समोर आली आहे. खरे तर केवायसी करताना महिलांना OTP एररचा प्रॉब्लेम येतोय.
सर्वर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे महिलांना हा प्रॉब्लेम येतोय. केवायसी साठी लाभार्थी महिलांना सायबर कॅफे तसेच आपले सेवा केंद्र समोर दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. तरीही काही महिलांची केवायसी होत नाहीये. दरम्यान आता या संदर्भात मंत्री अतिथी तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे.
मंत्री महोदयांनी सर्वर व्यवस्थित नसल्याने त्यावर राज्य सरकारकडून काम केले जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच राज्यातील 29 जिल्ह्यांमधील महिलांना केवायसी साठी मुदतवाढ देण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसीसाठी 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यात दररोज चार ते पाच लाख महिला केवायसी करत आहेत. आतापर्यंत एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची केवायसी झाली आहे. दरम्यान आता राज्य शासनाकडून पूरग्रस्त भागातील महिलांना पंधरा दिवसांची मुदत वाढ दिली जाणार आहे.