Tata समूहाचा ‘हा’ शेअर 90 टक्क्यांनी घसरला, घसरणीनंतरही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले नाही, कारण….

Published on -

Tata Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ही बातमी टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची आहे. खरंतर टाटा ग्रुपच्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये आज अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर या शेअरची किंमत आज तब्बल 90 टक्क्यांनी घसरली. बाजार उघडताच स्टॉक 1015 रुपयाच्या लो लेव्हलवर पोहोचला. मात्र या शेअर्समध्ये झालेल्या आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोणतेच नुकसान झाले नाही. कारण की कंपनीने या शेअर्सचे विभाजन केले आहे.

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीने प्रत्यक्षात 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या आपल्या शेअरचे विभाजन करत आहेत. तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअर्स दिले जात आहेत तर काही कंपन्या डिविडेंटचा लाभ देत आहेत.

यामुळे शेअर मार्केटमध्ये अनेक स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर तिमाहीचे निकाल देखील समोर येत आहेत. यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती.

कंपनीने दहा रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअर्सचे एक रुपये दर्शनी मूल्यसह 10 शेअर्स मध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपनीने आजची रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. अर्थात सोमवारी बाजार बंद होताना ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे स्टॉक होते ते या शेअरच्या विभाजनासाठी पात्र ठरलेत.

सोमवारी टाटा इन्व्हेस्टमेंट चा शेअर 7.04 टक्क्यांनी वाढून 9,949 रुपयांवर बंद झाला. आज मंगळवारी समायोजन झाल्यानंतर शेअर्स घसरले. सुरुवातीच्या टप्प्यात हे शेअर्स 1056 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. म्हणजेच कंपनीच्या स्टॉक मध्ये प्रचंड घसरण झाल्याची दिसते. परंतु ही घसरण शेअर्सच्या विभाजनामुळे झाली आहे.

या घसरणीचा कंपनीच्या मार्केट कॅपिटलवर तसेच गुंतवणूकदारांच्या होल्डिंगवर कोणताच परिणाम झालेला नाही. सध्या स्थितीला या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1049 रुपयांवर व्यवहार करत आहेत. खरे तर, शेअरच्या विभाजनामुळे कंपनीच्या एकूण शेअरची संख्या वाढत असते.

याचा फायदा छोट्या गुंतवणूकदारांना होतो. शेअर्स स्वस्त होत असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करणे सोपे होते. लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या असा निर्णय घेत असतात. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने देखील याच कारणाने हा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe