Post Office Scheme : पोस्ट ऑफिस कडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना सुरु करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिस अल्पवयीन मुलांसाठी तसेच सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी देखील बचत योजना चालवत आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पोस्टाकडून चांगले व्याजही मिळते.
दरम्यान जर तुम्हालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका विशेष योजनेची माहिती सांगणार आहोत. आज आपण पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम बाबत माहिती पाहणार आहोत. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून दरमहा निश्चित व्याज मिळू शकता.

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये सध्या स्थितीला ग्राहकांना 7.60 टक्के दराने बॅग दिले जात आहे. हे व्याजदर बँकांच्या एफडी योजनांपेक्षा फार अधिक आहे. त्यामुळे अनेक जण यात गुंतवणूक करत आहेत. मंथली इनकम स्कीम पाच वर्षांची आहे.
या योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचे अकाउंट ओपन करता येतात. सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट ओपन करून ग्राहकांना चांगले व्याज दिले जाते. जर समजा पोस्टाच्या या योजनेत सिंगल अकाउंट ओपन केले तर ग्राहकांना जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
तसेच जॉईंट अकाउंट ओपन करून 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. जॉइंट अकाउंट मध्ये गुंतवणूकदार त्यांच्या जोडीदारासमवेत गुंतवणूक करू शकता. रिटायरमेंट नंतर पती-पत्नी दोघांच्या नावाने जॉइंट अकाउंट ओपन करून यात गुंतवणूक केल्यास उतार वयात दरमहा निश्चित पैसा मिळत राहतो.
आता आपण पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये सिंगल अकाउंटमध्ये पाच लाखांची इन्व्हेस्टमेंट केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याची माहिती पाहूयात.
प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळणार ?
मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूकदारांनी पाच लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना 7.60% व्याजदराने प्रत्येक महिन्याला 3 हजार 167 रुपये एवढे व्याज मिळणार आहे. अर्थात पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदाराला एक लाख 90 हजार वीस रुपये व्याज मिळणार आहे.
सिंगल अकाउंट ओपन करून नऊ लाखांची गुंतवणूक केल्यास दरमहा 5 हजार 700 रुपयांचे व्याज मिळणार आहे. अर्थात पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदाराला तीन लाख 42 हजार रुपयांचे व्याज मिळणार आ