Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?

Published on -

Tata Safest Cars : नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्याच कामाची ठरणार आहे. सरकारने अलीकडेच जीएसटी मध्ये मोठा रिफॉर्म केला आहे. सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळतोय. या निर्णया अंतर्गत 350 सीसी पेक्षा कमी किमतीच्या मोटरसायकल्स स्वस्त झाल्यात. तसेच दूध दही सारख्या गोष्टींवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यामुळे मोबाईलच्या किमती सुद्धा कमी होत आहेत. एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी सुद्धा सरकारने कमी केला आहे. एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स वरील वस्तूंच्या किमतीही जीएसटी कपातीमुळे कमी झाल्या आहेत. याव्यतिरिक्त 1300 CC पेक्षा कमी तसेच चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या छोट्या कार्सच्या जीएसटी मध्ये देखील सरकारकडून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक छोट्या गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. किमती कमी झाल्यात म्हणून अनेक जण आता नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान तुम्हालाही नवीन गाडी घ्यायची असल्यास आजची बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण टाटा कंपनीच्या सर्वाधिक सुरक्षित 5 गाड्यांबाबत माहिती पाहणार आहोत.

मॉडेल सुरुवातीची एक्स शोरूम किंमत फिचर्स 
Nexon7.32 लाख रुपये सर्वाधिक सेफ विक्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग इंजिन 1.2L टर्बो-पेट्रोल 1.5L डिझेल EV चा पर्याय 10.25-इंच टचस्क्रीन व्हेंटिलेटेड सीट्स सनरूफ 6 एअरबॅग्ज पेट्रोल व्हेरिएंट 17 मायलेज डिझेल व्हेरिएंट 24 चं मायलेज 
Punch 5.50 लाख रुपये Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग इंजिन 1.2L पेट्रोल CNG पर्याय उपलब्ध मायलेज पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 20.8 किमी प्रति लिटर सीएनजीमध्ये 26.99 किमी
Tigor5.49 लाख रुपये Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग इंजिन 1.2L पेट्रोल CNG पर्याय उपलब्ध मायलेज CNG मॉडेल 28 किमी  पेट्रोल 19 किमी
Tata Altroz6.30 लाख रुपयेGlobal NCAP क्रॅश टेस्टंमघ्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग इंजिन 1.2L पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल1.5L डिझेल CNG पर्याय उपलब्ध 90-डिग्री ओपनिंग डोअर्स क्रूझ कंट्रोलसेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मायलेज – पेट्रोलमध्ये 19  सीएनजीमध्ये 30 किमी
Tiago4.57 लाख रुपये Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग  ड्युअल एअरबॅग्ज कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल इंजिन 1.2L पेट्रोल CNG पर्याय सुद्धा उपलब्ध टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मायलेज सीएनजी मॉडेल 28 किमी पेट्रोलमध्ये 19 किमी
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe