दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करायला हवेत ? वाचा सविस्तर

Published on -

Stock To Buy : देशात लवकरच दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या दिवाळीत प्रत्येकजण आपले घर वेगवेगळ्या दिव्यांनी सजवणार आहे. पण जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर या दिवाळीत तुम्ही तुमच्या घरासोबत तुमचा पोर्टफोलिओही चांगलाच सजवण्याचा प्रयत्न करायला हवा.

दरम्यान जर तुम्हाला यंदाच्या दीपोत्सवात मोठी गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण आज आपण टॉप ब्रोकरेज कडून सुचवण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.

हे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत 

अपोलो हॉस्पिटल्स – टॉप ब्रोकरेज फर्मने प्रभुदास लिलाधरने दिवाळीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. यात पहिला स्टॉक आहे अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझचा. याची टार्गेट प्राईस ९,३०० रुपये आहे. अर्थात यात २१% वाढ होणार आहे. 

ब्रिटानिया इंडस्ट्रीज – ही एक प्रमुख एफएमसीजी आहे. या कंपनीच्या शेअर्स साठी गुंतवणूकदारांनी ६,४८४ रुपये टार्गेट प्राईस सेट केली आहे. म्हणजे या स्टॉकमध्ये १०% वाढ होणार आहे. जीएसटी कपातीमुळे व्हॉल्यूममध्ये ६-८% वाढ होऊ शकते.

ICICI – खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या या बँकेच्या शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश आहेत. हा स्टॉक येत्या काळात २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. या शेअर साठी टॉप ब्रोकरेज कडून ₹१,७३० ची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

आयटीसी लिमिटेड – या कंपनीचे शेअर सुद्धा येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. या कंपनीचे शेअर्स ३३% रिटर्न देण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअर्स साठी ५३० रुपयांची टार्गेट प्राईस ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी मार्जिनवर दबाव होता, परंतु सॉफ्ट टोबॅकोच्या किमती, एफएमसीजी रिकव्हरी आणि सिगारेटवरील जीएसटी २.० मध्ये सुधारणा यामुळे येत्या काळात या कंपनीच्या स्टॉक मधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) – देशातील सर्वाधिक मोठ्या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअर्स साठी ₹९६० रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. अर्थात येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना नऊ टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. 

स्डोम्स इंडस्ट्रीज – या स्टॉकच्या किमती देखील येत्या काळात वाढू शकतात. यासाठी ३,०८५ रुपयांची टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. म्हणजे या स्टॉक मधून २२ टक्के रिटर्न मिळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe