Bonus Share : दिवाळीच्या आधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करतायेत. सोबतच कंपन्यांकडून आता आपल्या गुंतवणूकदारांना वेगवेगळे कॉर्पोरेट लाभ सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहेत.
बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट दिले जात आहेत. दरम्यान जर तुम्हालाही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या आधीच शेअर मार्केट मधील लिस्टेड एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 24 बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.

एपिस इंडिया लिमिटेड करून ही घोषणा करण्यात आली असून कंपनीच्या या घोषणेनंतर शेअर्स मध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 13 ऑक्टोबर रोजी आपल्या गुंतवणूकदारांना 24 बोनस शेअर्स दिले जातील अशी घोषणा केली.
कंपनीच्या या घोषणेनंतर मंगळवारी याच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागले होते. दरम्यान आता आपण या बोनस इश्यूसाठी कंपनीने कोणती रेकॉर्ड निश्चित केली आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे कंपनीचा प्लॅन
Apis India Limited ने बोनस शेअर्स बाबत स्टॉक एक्सचेंज ला माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी दहा रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअर मागे आपल्या गुंतवणूकदारांना 24 बोनस शेअर देणार आहे. मात्र कंपनीने अजून रेकॉर्ड डेट बाबत स्टॉक एक्सचेंज ला काहीच माहिती पुरवलेली नाही.
पण लवकरच कंपनीकडून स्टॉक एक्सचेंजला रेकॉर्ड बाबत माहिती दिली जाणार अशी आशा आहे. यामुळे ज्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी या कंपनीचा पर्याय बेस्ट राहणार आहे.
या बोनस येशूची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कंपनी तब्बल 15 वर्षांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. याआधी कंपनीने 2010 मध्ये असा निर्णय घेतला होता आणि थेट आता 2025 मध्ये कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी बोनस शेअर्स दिले जाणार आहेत.
महत्वाचे बाब म्हणजे दिवाळीच्या आधीच कंपनीने बोनस शेअर्स बाबत घोषणा केली असेल आणि सध्या या कंपनीचे स्टॉक फोकसमध्ये आहेत. सध्या या कंपनीचा स्टॉक 819 रुपयांवर व्यवहार करतोय. गेल्या तीन महिन्यात कंपनीच्या स्टॉकने 152 टक्क्यांनी आणि मागील एका वर्षात 222% रिटर्न दिले आहेत.