चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही ! 

Published on -

Banking News : आज भारतात सगळीकडे यूपीआय चा वापर केला जातोय. यूपीआय मुळे अगदी सहजतेने पैशांचे व्यवहार करता येणे शक्य झाले आहे.

फोन पे, गुगल पे सारखे अप्लिकेशन्सच्या माध्यमातून UPI पेमेंट अधिक सोपे झाले असून याद्वारे कोणत्याही व्यक्तीला अवघ्या एका क्लिकमध्ये पैसे पाठवता येतात.

डिजिटल पेमेंटमुळे पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले आहेत. पण काही विशिष्ट कारणांसाठी  आपल्याला चेकचा वापर करावा लागतो. आजही लाखो लोक असे आहेत जे की आर्थिक व्यवहारांसाठी चेकचा वापर करत आहेत.

पण, चेक स्वाक्षरी केल्यावरच वैध ठरतो. चेकवर स्वाक्षरी करताना कोणत्या रंगाच्या पेनचा वापर करावा याबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगतात. काहीजणांचा असा समज आहे की काळ्या शाईने लिहिलेला चेक बँक स्कॅनिंग सिस्टीममध्ये योग्य प्रकारे दिसत नाही आणि त्यामुळे तो नाकारला जातो.

मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. सरकारी एजन्सी पीआयबीने याबाबत मोठी माहिती दिलीये. फॅक्ट चेकने सोशल मीडियामध्ये केल्या जाणाऱ्या या दाव्याचे खंडन केले आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चेक बँकेत जमा झाल्यानंतर त्याची डिजिटल स्कॅनिंग प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान चेकच्या तीन प्रतिमा घेतल्या जातात एक ग्रेस्केल फ्रंट, एक काळा-पांढरा फ्रंट आणि एक काळा-पांढरा बॅक. या प्रतिमांमध्ये जी शाई सर्वाधिक स्पष्ट दिसते, ती बँकेसाठी योग्य मानली जाते.

त्यामुळे ग्राहकांनी अशा पेनचा वापर करावा ज्याची शाई स्कॅनमध्ये स्पष्ट दिसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरबीआयने स्वाक्षरीसाठी कोणत्याही विशिष्ट रंगाची बंधनकारक अट घातलेली नाही.

निळा, काळा किंवा हिरवा कोणत्याही रंगाच्या पेनने लिहिलेला चेक बँकेकडून नाकारला जाऊ शकत नाही. मात्र, आरबीआयने कायमस्वरूपी शाई असणारे पेन वापरणे अनिवार्य केले आहे, जेणेकरून फसवणुकीचा धोका कमी होईल.

जेल पेन किंवा स्केच पेनचा वापर केल्यास शाई पसरू शकते आणि स्कॅनिंगदरम्यान तपशील अस्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे अशा पेनचा वापर टाळण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काळ्या पेनने लिहिलेला चेक अवैध ठरत नाही.

यामुळे तुम्ही कोणत्याही कलरच्या शाईने चेक लिहला तरीही काहीही फरक पडणार नाही. ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे कोणत्याही रंगाच्या कायमस्वरूपी शाई पेनचा वापर करता येतो.

त्यामुळे काळ्या पेनचा वापर केल्यास चेक नाकारला जाईल, हा समज पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण बँकिंग व्यवहार करताना स्पष्ट आणि टिकाऊ शाईचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe