महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ? 

Published on -

State Employee News – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे.

खरेतर, राज्यातील सरकारी तसेच बँक कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी सुट्टी विशेष खास ठरणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना 20 ऑक्टोबरपासून थेट 26 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी मिळणार आहेत. पण यासाठी कर्मचाऱ्यांना शक्कल लढवायची आहे. दिवाळीच्या निमित्ताने देशातील बहुतांश राज्यांमध्ये आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

24 तारखेला सुट्टी नाहीये. पण या दिवशी किरकोळ रजा घेतली तर कर्मचाऱ्यांना पूर्ण आठवडा सुट्टी मिळू शकते. शुक्रवारी किरकोळ रजेचा लाभ मिळाला तर कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्ट्या अनुभवता येणार आहेत. 

पहा सुट्टीच वेळापत्रक 

तारीखकोणत्या राज्यात सुट्टीसुट्टीच कारण
20 ऑक्टोबरमणिपूर, ओडिशा, जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्य नरक चतुर्दशी व काली पूजा
21 ऑक्टोबरमहाराष्ट्र , मध्य प्रदेश , ओडिशा , सिक्कीम, मणिपूर, जम्मू-काश्मीरदिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)
22 ऑक्टोबरगुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेशबली प्रतिपदा
विक्रम संवत
नवीन वर्ष दिन 
बलिपाडवा
23 ऑक्टोबरगुजरात, महाराष्ट्र, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल , हिमाचल प्रदेशभाऊबीज
चित्रगुप्त जयंती
निंगोल चाककुबा
24 ऑक्टोबरसुट्टी नाही
25 ऑक्टोबरशासकीय सुट्टीशनिवार
26 ऑक्टोबरशासकीय सुट्टीरविवार

अर्थात जर कर्मचाऱ्यांनी 24 ऑक्टोबरला किरकोळ रजा (Casual Leave) घेतली, तर 25 ऑक्टोबर शनिवार आणि 26 ऑक्टोबर रविवार असल्याने सलग सुट्ट्यांचा फायदा घेता येईल. त्यामुळे सरकारी व बँक कर्मचाऱ्यांना अख्ख्या आठवड्याची सुट्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण दिवाळी सुट्टी 23 तारखेपुरतीच मर्यादित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe