सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ 5 नियमात होणार मोठा बदल, मिळणार मोठे आर्थिक लाभ

Published on -

DA Hike News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. देशातील 1 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी व पेन्शनधारकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. आता आपण सरकारने दिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी कोणते निर्णय घेतले आहेत? याचा त्यांना काय लाभ मिळणार? याची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सुविधा – सरकारने पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. नव्या निर्णयामुळे आता दरवर्षी बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही. कारण आता हे प्रमाणपत्र घरबसल्या मिळवता येणे शक्य झाले आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने याचे डिजिटल प्रमाणपत्र पेन्शनधारकांना सादर करता येणार अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महागाई भत्त्यात वाढ – सरकारने अलीकडेच DA वाढीची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुलै पासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. या भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा DA आता 58 टक्क्यांवर गेला आहे. या निर्णयाचा फायदा 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होईल अशी आशा आहे. यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

CGHS मध्ये मोठा बदल – केंद्रीय सरकारी स्वास्थ्य योजनेच्या मेडिकल पॅकेजमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवीन बदल 13 ऑक्टोबरपासून सक्रिय झाले आहेत. यामुळे कॅशलेस मेडिक्लेमची अंमलबजावणी अधिक सुलभ होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा म्हणजे आता उपचारासाठी कर्मचाऱ्यांची खिशातून पैसे खर्च करण्याची गरज कमी होणार आहे.

बोनस मिळणार – ग्रुप ‘सी’ आणि नॉन-गॅझेटेड ग्रुप ‘बी’ कर्मचाऱ्यांना सरकारने बोनस जाहीर केला आहे. या कर्मचाऱ्यांना आता 30 दिवसांचा अॅडहॉक बोनस देण्यात येणार आहे. यासाठी प्रति कर्मचारी 6 हजार 908 रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, काही पात्र कर्मचाऱ्यांना 60 दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) सुद्धा दिला जाणार आहे.

UPS मध्ये बदल – सरकारने लागू केलेल्या युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये पण बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांना अधिक ग्रॅच्युटी आणि निवृत्ती लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलीये. यामुळे कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe