अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- दिल्ली राष्ट्रीय राजधानी असली तरी बुधवारी कोरोना संसर्गाची विक्रमी संख्या आढळून आली. त्यावरून दिल्लीतील संसर्गाचा वेग प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने वाढत्या संसर्गावरून दिल्ली सरकारला फटकारले आहे.
दिल्ली आता कोरोना कॅपिटल होत चालल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हेल्थ बुलेटिननुसार बुधवारी एका दिवसात दिल्लीत सुमारे ७ हजारांवर कोरोना बाधित आढळले तर ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
महामारीला रोखण्यासाठी दिल्ली सरकारने केलेले प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती हिमा कोहली व सुब्रमण्यम प्रसाद यांच्या पीठासमोर झाली.
पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण समितीने यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या दहा दिवसांपासून परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.
सरासरी पाच हजार रुग्णांच्या तुलनेत केवळ दहा दिवसांत ५० हजारांवर रुग्ण आढळले. या समस्येवर दिल्ली सरकार स्वतंत्रपणे कार्ययोजना तयार करत आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved