Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे. ही भारतातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाई स्पीड ट्रेन. या गाडीचा वेग सुरक्षित अन आरामदायी प्रवास यामुळे ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे. यामुळे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या भागात ही गाडी सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत.
दरम्यान आता देशाला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भेट मिळणार अशी बातमी समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाने याबाबतची अधिसूचना देखील काढली आहे.

दरम्यान रेल्वे बोर्डाकडून ज्या नवीन चार गाड्या सुरू केल्या जाणार आहेत त्यापैकी तीन उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथून धावणार आहेत. या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या लखनऊ ते सहारनपूर, फिरोजपूर ते दिल्ली, बेंगळुरू ते एर्नाकुलम आणि वाराणसी ते खजुराहो दरम्यान धावणार आहेत. उत्तर प्रदेशात आधीच एक डझन वंदे भारत गाड्या कार्यरत आहेत आणि आता यात पुन्हा या वंदे भारत गाड्यांची भर पडणार आहे.
UP ला मिळणाऱ्या दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे राज्यातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरे वंदे भारत नेटवर्कशी जोडली जातील. दुसरीकडे, दिल्ली-हावडा मार्गावर अनेक वंदे भारत गाड्या आधीच धावतात. दरम्यान आता आपण या चारही गाड्यांचे वेळापत्रक आणि रूट जाणून घेणार आहोत.
लखनऊ-सहारणपूर वंदे भारत एक्सप्रेस मार्ग
लखनऊ जंक्शन-सहारणपूर वंदे भारत एक्सप्रेस: ही ट्रेन लखनऊ जंक्शनवरून पहाटे ५:०० वाजता सुटेल आणि सीतापूर, शाहजहानपूर, बरेली, मुरादाबाद, नजीबाबाद आणि रुरकी या मार्गांनी दुपारी १२:४५ वाजता सहारनपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ही ट्रेन दुपारी ३:०० वाजता सुटेल आणि लखनऊ जंक्शनवर रात्री ११:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन सोमवार वगळता सर्व दिवस चालेल.
फिरोजपूर कॅन्ट – दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
फिरोजपूर कॅन्ट – दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस: ही ट्रेन फिरोजपूर कॅन्ट येथून सकाळी ७:५५ वाजता सुटते आणि फरीदकोट, बठिंडा, धुरी, पटियाला, अंबाला कॅन्ट, कुरुक्षेत्र आणि पानीपत मार्गे दुपारी २:३५ वाजता दिल्लीला पोहोचते. हीच ट्रेन दिल्लीहून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि फिरोजपूर कॅन्ट येथे रात्री १०:३५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन फक्त बुधवारीच चालणार नाही.
वाराणसी-खजुराहो वंदे भारत ट्रेन भेट
वाराणसी-खजुराहो वंदे भारत ट्रेन: ही ट्रेन वाराणसीहून सकाळी ५:२५ वाजता निघेल, विंध्याचल, प्रयागराज, छेओकी, चित्रकूट धाम, बांदा, महोबा येथून जाईल आणि दुपारी १:१० वाजता खजुराहोला पोहोचेल. त्यानंतर ही ट्रेन खजुराहोहून दुपारी ३:२० वाजता निघेल आणि रात्री ११ वाजता वाराणसीला पोहोचेल. ही ट्रेन गुरुवार वगळता सर्व दिवस चालेल.
बेंगळुरू-एर्नाकुलम वंदे भारत एक्सप्रेस
केएसआर बेंगळुरू-एर्नाकुलम वंदे भारत एक्सप्रेस: ही ट्रेन बेंगळुरूहून सकाळी ५:१० वाजता निघेल. ही ट्रेन दुपारी १:५० वाजता एर्नाकुलम येथे पोहोचेल आणि कृष्णराजपुरम, सेलम, इरोड, तिरुप्पूर, कोइम्बतूर, पलक्कड आणि त्रिशूर येथे थांबेल. हीच ट्रेन एर्नाकुलम येथून दुपारी २:२० वाजता सुटेल आणि रात्री ११ वाजता केएसआर बेंगळुरू येथे पोहोचेल. ही ट्रेन बुधवार वगळता सर्व सहा दिवस चालेल.













