अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-विनयभंगास विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण करून तिचे डोळे निकामी करून आरोपी पसार झाला आहे. ही घटना पुण्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात घडली आहे.
पोलीस या अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत. न्हावरे गावातील एक 37 वर्षीय महिला मंगळवारी रात्री घराशेजारी शौचास गेली होती. तिथे जवळच्या झुडपात लपून बसलेल्या आरोपीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.
महिलेने त्याला विरोध केल्यावर अज्ञाताने तिला मारहाण केली आणि तिचे दोन्ही डोळे निकामी केले. अज्ञात व्यक्ती विरोधात शिरूर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved