माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सरकार वर केला ‘हा’ आरोप !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीकडून चांगले विकासाचे काम उभे राहील ही अपेक्षा होती. मात्र, कामे करण्याऐवजी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामाला स्थगिती देऊन खो घालण्याचे एकमेव काम झाल्याची टीका राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.

धामोरी बुद्रूक गावातील १५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच पशूधन वाढवण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव कुसमुडे होते. कर्डिले म्हणाले,

मागील पाच वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंचवीस पंधराचे राहुरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे मंजूर झाले असून या कामांच्या वर्कऑर्डर देखील निघाल्या आहेत. मात्र, या विकास कामांचे श्रेय दुसऱ्याला जाऊ नये म्हणून आघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधीने कामाला स्थगिती देण्याचे काम केले आहे.

दुसऱ्याने केलेल्या विकास कामाला खो घालण्याऐवजी तुमचे कर्तृत्व काय ते दाखवा, असे आव्हान कर्डिले यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केले. महावितरणची गाडी शेतकऱ्यांच्या दारात या ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या घोषणेची शिवाजी कर्डिले यांनी खिल्ली उडवत नवीन ट्रान्सफार्मरच नाहीत, त

र शेतकऱ्यांच्या दारात गाडी कशी जाणार, तसेच विहिरीला पाणी आहे. मात्र, ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्याने उभी पिके जळून चालली आहेत. तनपुरे हे राज्याचे की मतदारसंघापुरते मंत्री, त्यांना नेमका अधिकार कुठला दिला? हा सवाल करत मंत्रिपद असताना राहुरीचे प्रश्न सोडवण्यासाठी घरातील लोकांना आंदोलनाची भाषा करावी लागते,

हे दुर्दैवी असल्याचे कर्डिले यांनी म्हटले. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले, पाझर तलाव भरभरून वाहिले आहेत. वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रातील तलाव पावसाच्या पाण्याने भरले असल्याचे जगजाहीर असताना हे तलाव अनेक वर्षांच्या कालखंडात आपणच भरल्याच्या गप्पा मारण्याचे काम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून केले

जात असल्याची टीका कर्डिले यांनी केली. लोकप्रतिनिधी या नात्याने नुकसान झालेल्या भागात भेटी देऊन तत्काळ पंचनामे करणे गरजेचे असताना मात्र पाठ फिरवली गेली.

या कार्यक्रमास सुरसिंग पवार, रवींद्र म्हसे, शहाजी ठाकूर, अशोक उंडे, सुभाष गायकवाड, बाळासाहेब जठार, प्रभाकर हरिश्चंद्रे, सचिन मेहेत्रे, निसार शेख, मयूर गवळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अशोक बकरे, महेश उगले आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News