सोन्यात गुंतवणूक करताय ? पुढील दोन-तीन वर्षात सोन्याच्या किमती किती वाढतील ? वाचा…

Published on -

Gold Rate Prediction : मागील वर्ष शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे राहिले तर सोन आणि चांदी या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळाला. विशेष म्हणजे अजूनही सोन आणि चांदीची किंमत विक्रमी पातळीवर आहे आणि येत्या काळात देखील अशीच त्याची यामध्ये कायम राहू शकते असे तरी सध्याचे चित्र सांगते.

अशा स्थितीत पुढील दोन-तीन वर्ष सोन्याचा बाजार नेमका कसा राहणार, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना किती नफा मिळू शकतो याचा सगळ्या गोष्टींचा आज आपण येथे आढावा घेणार आहोत.

जागतिक पातळीवरील वाढती अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक तणाव आणि चलनवाढीची भीती या सगळ्या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळख असलेल्या सोन्याने गेल्या वर्षभरात जबरदस्त झेप घेतली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जवळपास ७३ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या सोने प्रति औंस ४,८०० डॉलर्सच्या पुढे व्यवहार करत आहे. भारतीय रुपयांमध्ये पाहता, १० ग्रॅम म्हणजेच प्रतितोळा सोन्याचा दर सुमारे १ लाख ५५ हजार ९२५ रुपयांवर पोहोचला आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही तेजी इथेच थांबणारी नाही. पुढील दोन ते तीन वर्षांत सोन्याची किंमत प्रति औंस ७ हजार डॉलर्सपर्यंत जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक भू-राजकीय तणाव, वाढता सरकारी खर्च, अर्थसंकल्पीय तूट आणि मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणात होत असलेली सोन्याची खरेदी या सगळ्या घटकांमुळे सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, SAMCO सिक्युरिटीजचे अपूर्व शेठ सांगतात की, सध्याच्या परिस्थितीत सोने केवळ अल्पकालीन नफ्यासाठीचे साधन नसून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत मजबूत पर्याय आहे. व्याजदरांमधील अस्थिरता आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता पाहता, गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वळताना दिसतो आहे.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अपूर्व शेठ यांनी पुढील महत्त्वाचा टप्पा सुमारे ७,०४० डॉलर प्रति औंस असल्याचे नमूद केले आहे. जर रुपया सध्याच्या पातळीवर स्थिर राहिला, तर भारतात MCX वर सोन्याची किंमत तब्बल २.३ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे येत्या काळात सोने पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, जेफरीजचे जागतिक इक्विटी स्ट्रॅटेजी प्रमुख क्रिस्टोफर वुड देखील सोन्याबाबत आशावादी आहेत. त्यांच्या मते, चालू तेजीच्या बाजारात सोने प्रति औंस ६,६०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. हा अंदाज सोन्याच्या ऐतिहासिक उच्चांक आणि अमेरिकन उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अलीकडेच सोन्या-चांदीच्या दरात थोडी घसरण झाली असली, तरी तज्ज्ञांच्या मते ही घसरण नफा-वसुलीमुळे असून ट्रेंड बदलण्याचे संकेत नाहीत.

एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर यांच्या मते, एमसीएक्सवर १.५८ ते १.६० लाख रुपयांची पातळी ओलांडल्यास सोन्याचे दर १.६५ ते १.७० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सध्याची घसरण ही घाबरण्याची नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संधी मानावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe