रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 15 स्थानकावरून धावणार नवीन रेल्वे गाडी

Published on -

Maharashtra Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे या विशेष गाडीला राज्यातील 15 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर झाला आहे. अशा स्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचा आढावा येथे घेणार आहोत.

मंडळी, सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासासाठीची अतिरिक्त मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने भुसावळ आणि जळगाव मार्गे मुंबई–नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ, खान्देश आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कसे राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 02139 ही विशेष गाडी शनिवार, 25 जानेवारी रोजी मध्यरात्री 00.20 वाजता CSMT येथून सुटेल.

ही गाडी सकाळी 07.28 वाजता जळगाव आणि 08.05 वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर दुपारी 03.30 वाजता नागपूर येथे तिचा अंतिम थांबा असेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 02140 ही विशेष गाडी त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01.30 वाजता CSMT, मुंबई येथे पोहोचेल.

या विशेष गाड्यांमुळे सण-उत्सव, सुट्ट्या तसेच अचानक वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नक्कीच या विशेष गाडीमुळे विदर्भ व खानदेश विभागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

15 रेल्वे स्टेशनवरील नागरिकांना मिळणार दिलासा 

ही विशेष गाडी दोन्ही दिशांनी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना थेट आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

डब्यांच्या रचनेबाबत बोलायचे झाल्यास, या विशेष गाडीत एक वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा डबा, सहा वातानुकुलित तृतीय श्रेणीचे डबे, नऊ शयनयान डबे, चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, एक गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणीचा डबा आणि एक जनरेटर व्हॅन असा समावेश असणार आहे.

ही गाडी एलएचबी कोचेससह धावणार असल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई–नागपूर मार्गावरील प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार असून, गर्दीमुळे होणारा त्रासही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe