प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे रेल्वे विभागात दुहेरीकरण कामामुळे २६ एक्स्प्रेस व १२ डेमू गाड्या रद्द; प्रवाशांना मोठी गैरसोय

Published on -

Pune News : पुणे रेल्वे विभागाच्या दौड-काष्टी स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे २४ आणि २५ जानेवारी रोजी धावणाऱ्या तब्बल २६ एक्स्प्रेस व १२ डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पुणे-सोलापूर आणि पुणे-भुसावळ मार्गावरील सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार असल्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होणार आहे.

सदर कामासाठी रुळांवर ब्लॉक घेतल्यामुळे काही महत्वाच्या गाड्या उशिरा सुटणार आहेत. उदा., पुणे-हावडा एक्स्प्रेस २४ जानेवारीला ४ तास उशिराने सुटेल, पुणे-जम्मूतावी एक्स्प्रेस २४ जानेवारीला २ तास उशिरा सुटेल, तर पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस २५ जानेवारीला १ तास उशिरा सुटेल. तसेच कुर्ला-विशाखापट्टणम एक्स्प्रेस २४ आणि २५ जानेवारीला २ तास उशिराने प्रवाशांना भेटेल.

काही महत्वाच्या गाड्या दोन्ही दिशांनी रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे-नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-अजनी-पुणे एक्स्प्रेस,

पुणे-नागपूर-पुणे गरीबरथ, पुणे-नांदेड-पुणे एक्स्प्रेस, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-अजनी-अमरावती एक्स्प्रेस, दौंड-निजामुद्दीन-दौंड एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे पॅसेंजर आणि हडपसर-सोलापूर डेमू यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, सातारा-दादर एक्स्प्रेस सातारा-जेजुरी-पुणे मार्गे वळवली आहे, तर इतर काही गाड्या लोणावळा-कल्याण-मनमाड मार्गे प्रवास करतील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सूचना केली आहे की, २४ व २५ जानेवारीला पुणे-सोलापूर, पुणे-भुसावळ तसेच संबंधित मार्गावर प्रवास करत असलेले प्रवासी आपला प्रवास योजनेप्रमाणे आधीच ठरवून घ्यावेत.

प्रवाशांनी तिकीटबदल, रद्द किंवा उशिरा जाणाऱ्या गाड्यांची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा नजीकच्या स्थानकावरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या काळात प्रवाशांना रस्त्याने किंवा पर्यायी मार्गांद्वारे प्रवास करण्याचे पर्यायही विचारात घेण्याची सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे, जेणेकरून प्रवासात जास्त गैरसोय होऊ नये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News