PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २२वा हप्ता; फेब्रुवारीत मिळणार २००० रुपये, आधी पूर्ण करा ‘ही’ कामे

Published on -

PM Kisan Yojana : भारतातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते.

आतापर्यंत पीएम किसान योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आता शेतकरी २२व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२६ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा २२वा हप्ता जमा केला जाणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येकी २००० रुपयांचे तीन हप्ते करून थेट बँक खात्यात जमा केले जातात.

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. याआधी लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्यांनंतर म्हणजे फेब्रुवारीत पुढील हप्ता येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम, केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही किंवा ई-केवायसी प्रक्रिया अर्धवट राहिली आहे, अशा शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासोबतच जमिनीचे व्हेरिफिकेशन (Land Verification) करणे देखील गरजेचे आहे. जमीन नोंदी अद्ययावत नसतील तर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. काही राज्यांमध्ये फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नसेल, तर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही.

तसेच, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते, आधार नंबर किंवा नावामध्ये कोणतीही तफावत असल्यास हप्ता अडकू शकतो. शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

त्याचबरोबर आपला हप्ता येणार आहे की नाही, याचा स्टेटसही ऑनलाइन तपासता येतो. त्यामुळे फेब्रुवारीत २२वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News