रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! कोकण रेल्वेकडून गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक,मडगाव विशेष गाड्या सुरू

Published on -

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या कालावधीत कोकण मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे महामंडळाने काही विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे मुंबई–गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वेकडून गाडी क्रमांक ०११२९/०११३० लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन–लोकमान्य टिळक (ट) ही विशेष रेल्वे २५ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०११२९ ही विशेष गाडी रविवार, २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११३० ही २५ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाडीची डब्यांची रचना एकूण १८ डब्यांची असून त्यामध्ये २ टायर एसीचा १ डबा, ३ टायर एसीचे ३ डबे, स्लीपरचे ८ डबे, जनरलचे ४ डबे आणि एसएलआरचे २ डबे असणार आहेत.

यासोबतच कोकण रेल्वेकडून आधीच जाहीर करण्यात आलेल्या ०१००४/०१००३ मडगाव–लोकमान्य टिळक (ट) विशेष गाड्यांचेही परिचालन करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०१००४ ही २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१००३ ही २५ जानेवारी रोजी सकाळी ७.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

या विशेष गाड्या करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. या गाड्यांमध्ये एकूण २० डबे असून त्यात स्लीपरचे १८ आणि एसएलआरचे २ डबे असतील.

प्रवाशांनी गाड्यांच्या थांब्यांची व वेळापत्रकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी केआर मिरर अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे सुट्टीच्या काळातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News