गृहकर्ज घेताय? ‘ही’ सोपी युक्ती वापरली तर 50 लाखांच्या कर्जात 18 लाखांपर्यंत होऊ शकते बचत

Published on -

Home Loan : घर खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे मोठे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमती पाहता बहुतांश लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे स्वतःचे घर मिळाल्याचा आनंद असतो, तर दुसरीकडे तब्बल 15 ते 20 वर्षे चालणाऱ्या EMI चा आर्थिक ताणही असतो.

अनेक वेळा कर्जदार EMI भरत-भरत इतके व्याज देतात की मूळ कर्जाच्या जवळपास दुप्पट रक्कम बँकेला परत जाते. मात्र योग्य नियोजन केल्यास या व्याजाच्या ओझ्यात मोठी बचत करता येऊ शकते.

समजा तुम्ही 8.5 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. अशा वेळी तुमचा मासिक EMI सुमारे 43 हजार रुपयांच्या आसपास येतो.

सुरुवातीच्या काही वर्षांत EMI चा मोठा भाग व्याजात जातो आणि मूळ रक्कम फारशी कमी होत नाही. याच टप्प्यावर जर तुम्ही शहाणपणाचा निर्णय घेत प्रीपेमेंट केले, तर कर्जाचा कालावधी आणि एकूण व्याज दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

उदाहरणार्थ, कर्जाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच जर तुम्ही 5 लाख रुपये म्हणजेच सुमारे 10 टक्के प्रीपेमेंट केले, तर तुमचे कर्जाचे मुद्दल कमी होते. परिणामी पुढील वर्षांमध्ये व्याजाची गणना कमी रकमेवर होते.

यामुळे कर्जाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो आणि एकूण व्याजात तब्बल 18 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. बँका प्रीपेमेंटनंतर दोन पर्याय देतात – EMI कमी करणे किंवा कर्जाचा कालावधी कमी करणे. तज्ज्ञांच्या मते, EMI तसाच ठेवून कालावधी कमी करण्याचा पर्याय अधिक फायदेशीर ठरतो.

ही युक्ती का प्रभावी ठरते? कारण व्याजाची गणना नेहमी उर्वरित मुद्दलावर होते. जितके लवकर मुद्दल कमी, तितके कमी व्याज. विशेष म्हणजे फ्लोटिंग रेट गृहकर्जावर प्रीपेमेंटसाठी कोणताही दंड आकारला जात नाही. त्यामुळे बोनस, पगारवाढ किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यावर प्रीपेमेंट करणे ही अत्यंत हुशार आर्थिक चाल ठरते.

याशिवाय अल्प मुदतीचे कर्ज घेणे, EMI हळूहळू वाढवत नेणे, कमी व्याजदर असलेल्या बँकेत कर्ज हस्तांतरित करणे आणि घर खरेदीवेळी जास्त डाउन पेमेंट देणे या उपायांनीही गृहकर्जाचा व्याजभार मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. थोडेसे नियोजन आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला लाखोंची बचत करून देऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe