निधी कमी पडू देणार नाही – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन आवर्तन देता येईल का याची पडताळणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राहाता येथे केले.

राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात त्यांच्या उपस्थितीत गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे, माणिकराव कोकाटे, आशुतोष काळे, लहू कानडे, सुधाकर रोहम,

पदमकांत कुदळे, कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधाणे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अर्थचक्राला अधिक गती मिळाल्यानंतर विकासकामे अधिक वेगाने करण्यास सुरुवात झाली आहे.

कालवा दुरुस्तीतेची कामे प्राधान्याने केले जातील. शेटवच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. पाणी साठा वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्यात दोन च्या ऐवजी तीन आवर्तन देण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आहे त्या उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात यावा. त्यासाठी नाबार्ड च्या माध्यमातून कर्ज घेण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली. . पाण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागतो.

पाण्याचा प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी सामुदायिकपणे काम करूया व त्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नेतृत्व करावे असे मत त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले की, गेल्या वर्षी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा बैठक पार पडली.

त्यानंतर २० वर्षांहून अधिक काळानंतर गावांना पाणी मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्यामुळे पाटचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, चाऱ्यांची आणि कालव्यांची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

त्यामुळे कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी. कामाचा मोठा बॅकलोग भरून काढण्याची गरज असून योग्य नियोजन करून उजव्या आणि डाव्या या दोनही कालव्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की,

उजवा आणि डाव्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी निधी देण्यात यावा. कॅनॉल मजबुती करण करणे, चाऱ्या भूमिगत करणे ही कामे प्राधान्याने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा योग्य वापर करून पाणी वापराचे नियोजन करावे. यावेळी शेतकऱ्यांनी पाणी आरक्षणाबाबत आपल्या मागण्या मांडल्या. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेचा अहवाल सादर केला

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment