अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-ऑनलाईनच्या जगात अनेकजण शॉपिंग केल्यानंतर पेमेंट डिजिटलच्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाईन करतात. यामध्ये गुगल पे, पेटीएम, फोन-पे यांचा सर्वाधिक वापर होताना दिसते.
म्हणून याचा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गुगल पे, पेटीएम आणि फोन-पे सह थर्ड पार्टी पेमेंट ऍपच्या माध्यमातून UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी ऍप प्रोव्हाडर्सवर 1 जानेवारी 2021 पासून 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या अॅपकडून होणारी एकाधिकारशाही संपविण्यासाठी एनपीसीआयने हे पाऊल उचलले आहे. यामुळे भारतातील डिजिटल पेमेंटवर परिणाम होणार असल्याची प्रतिक्रिया गुगल पेने दिली आहे.
नव्या नियमानुसार कंपन्यांन्या त्यांच्याकडे होणाऱ्या डिजिटल ट्रान्झेक्शनच्या 30 टक्केच ट्रान्झेक्शन करता येणार आहेत. याचा मोठा फटका गुगल पे, फोन पे यांनाच बसणार आहे.
कारण या अॅपनी आधीचेच लिमिट पार केले आहे. महत्वाचे म्हणजे हा नवीन नियम रिलायन्स जिओ पेमेंट बँक आणि पेटीएमला बसणार नाही. कारण या कंपन्यांनी बँकिंग परवाने मिळविले असून ही अॅप थर्ड पार्टी अॅप कॅटॅगरीमध्ये येत नाहीत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved